गांधीनगर, 8 जानेवारी : कोरोनाची (CoronaVirus) रुग्णसंख्या जलद गतीने वाढत आहे. शुक्रवारी गुजरातमध्ये 5,396 नवीन रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. वाढती रुग्णसंख्या पाहता सरकारने नियम अधिक कडक केले आहे. मात्र या नियमांमध्ये एका कुटुंबाने आपल्या पाळीव कुत्र्याचा वाढदिवस धुमधडाक्यात साजरा केला. या ग्रँड पार्टीमध्ये कोणीही मास्ककडे लक्ष दिलं नव्हतं आणि येथे सोशल डिस्टन्सिंगही ठेवण्यात आलं नव्हतं. आता पोलिसांनी कोविड नियमांचं उल्लंघनात दोन भावांसह 3 जणांना अटक केली आहे. (Grand party of Rs 7 lakh for dogs birthday 3 arrested for violating Corona rules)
पोलिसांनी एका अधिकाऱ्याला सांगितलं की, चिराग पटेल आणि त्याचा भाऊ उर्विश पटेल, दोघेही अहमदाबाद शहरातील कृष्णानगरचे निवासी आहेत. त्यांनी आपला पाळीव कुत्रा 'एबी' च्या वाढदिवशी आपला मित्र दिव्येश महरियासोबत एक मोठी दावत ठेवली होती. त्यांनी सांगितलं की, शुक्रवारी रात्री एक प्लॉटवर आयोजित कार्यक्रमात तिघांच्या कुटुंबीयाशिवाय दोस्तदेखील मोठ्या संख्येत सामील झाले.
हे ही वाचा-कोरोना लसीकरणासाठी जाताना मृत्यूने गाठलं;10वीच्या विद्यार्थ्यांचा जागेवरच मृत्यूपार्टीवर खर्च केले 7 लाख रुपये...
पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितलं की, एक लोकप्रिय लोक गायकालाही कार्यक्रमाला बोलावलं होतं. कुत्र्याच्या वाढदिवसाचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाली होती. सांगितलं जात आहे की, कुत्र्याच्या मालकाने या ग्रँड पार्टीवर सात लाखांहून अधिक पैसे खर्च केले होते.
आयपीसी आणि महामारी अॅक्टअंतर्गत दाखल झाली केस
पोलिसांनी सांगितलं की, या कार्यक्रमात सामाजिक अंतर आणि फेस मास्क घालण्यासंबंधित कोविड-19 नियमांचं उल्लंघन करण्यात आला होता. या कार्यक्रमानंतर एफआयआर दाखल करण्यात आली आहे. या प्रकरणात चिराग पटेल, उर्विश पटेल आणि दिव्येश महरिया यांनाही अटक करण्यात आली आहे.
Published by:Meenal Gangurde
First published:
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.