मराठी बातम्या /बातम्या /क्राईम /

आजीला कसला आला इतका राग की 5 महिन्याच्या नातीला जमिनीवर आपटलं, जागीच मृत्यू

आजीला कसला आला इतका राग की 5 महिन्याच्या नातीला जमिनीवर आपटलं, जागीच मृत्यू

या प्रकरणात सनोली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.

या प्रकरणात सनोली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.

या प्रकरणात सनोली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.

  • Published by:  Renuka Dhaybar
पानीपत, 29 फेब्रुवारी : घरात लहान मुलं असणं म्हणजे सगळ्यांच्या चेहऱ्यावरचं हसू असतं. लहानग्या बाळामुळे कुटुंबातील सर्वजण सुखात आणि आनंदात असतात. पण घरातल्या वादामध्ये चिमुरड्यावर राग काढला आणि होत्याचं नव्हतं झालं. एका आजीने तिच्या 5 महिन्यांच्या चिमुरडीला जमिनीवर फेकून दिलं. यामध्ये अवघ्या 5 महिन्याच्या चिमुरडीचा जागीच मृत्यू झाला आहे. मुलगी व जावई यांच्यात झालेल्या भांडणावरून रागाच्या भरात आजीने निष्पाप आकशाला तिच्या मांडीवरून फेकलं. मुलगी तोंडावर जोरात फरशीवर आपटली, ज्यामुळे तिचा मृत्यू झाला. असे सांगितले जात आहे की, पत्नी स्मार्ट फोन मागत होती आणि नवरा पैसे नसल्याचे सांगत होता. या प्रकरणावरुन दोघांमध्ये भांडण झाले. जेव्हा मुलगी व सूनेमध्ये भांडण झाले तेव्हा सासूने चिडून मुलीला फेकलं. या प्रकरणात सनोली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे. मिळालेल्या माहितीनुसार, पत्नी आणि तिच्या पतीमध्ये हुंड्यावरून वाद सुरू होता. पत्नीला नवीन मोबाईल हवा होता पण पैसे नसल्यामुळे पतीने नकार दिला. त्यानंतर त्यांच्यामध्ये वाद वाढला आणि या सगळ्याला चिडून महिलेच्या सासूने मांडीवरच्या खेळत्या चिमुरडीला जमिनीवर फेकून दिलं. इतर बातम्या - पाच जणांच्या टोळीने तरुणाच्या डोक्यात वार करून केला खून, चेहरा दगडाने ठेचला गुन्हा केल्यानंतर आरोपी आजी फरार शेजाऱ्यांनी पोलिसांत प्रकरणाची माहिती दिली आणि घटनस्थळी दाखल होत आरोपीविरोधात पोलिसांत गुन्हा दाखल केला आहे. सध्या या प्रकरणाचा पोलीस तपास सुरू आहे. तर पोलीस अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, गुन्हा केल्यानंतर आरोपी आजी फरार असल्याची माहिती देण्यात आली आहे. आरोपी आजीच्या शोध घेण्यासाठी पोलीस परिसरात तपास घेत आहेत. 4 वर्षांआधी झाला होता विवाह जोडप्याचा 4 वर्षांआधी विवाह झाला होता. दोघेही उत्तर प्रदेशच्या मेरठ जिल्ह्यातील हरा निवासी गावातील रहिवासी आहेत. लग्नानंतर दोघांमध्ये सतत वाद होत असायचे. दोघांच्या वादामुळे संपूर्ण कुटुंबात फूट पडली होती. यासगळ्यात 5 महिन्याच्या चिमुरडीचा नाहक बळी गेला. इतर बातम्या - दिल्लीनंतर CAA विरोधात आणखी एक राज्य पेटलं; एकाचा मृत्यू, 6 शहरांमध्ये कर्फ्यू
First published:

पुढील बातम्या