Home /News /crime /

शेतात काम करताना काहीतरी घडलं आणि भावकीत चाचल्या चक्क कुऱ्हाडी, गोंदियातील धक्कादायक घटना

शेतात काम करताना काहीतरी घडलं आणि भावकीत चाचल्या चक्क कुऱ्हाडी, गोंदियातील धक्कादायक घटना

जमिनीच्या वादातून भावकीत झालेल्या भांडणात कुऱ्हाड चालल्याची घटना गोंदिया तालुक्यात घडली आहे.

    रवी सपाटे, गोंदिया, 6 ऑगस्ट : आपली माणसं आपण जपायला हवीत, असं म्हटलं जातं. कारण आपल्या पडक्या काळात किंवा संकट समयी आपली माणसंच मदतीला धावतात. हे वास्तव आहे. पण सध्या पैसे आणि ऐहिक वैभवाच्या लोभापायी माणूस माणुसकी विसरत चालला आहे. फक्त माणुसकीच नाही तर तो स्वत: माणूस आहे हे विसरतोय की काय? असा प्रश्न आपल्या मनात उपस्थित होईल अशा घटना हल्ली घडताना दिसत आहेत. सगळीकडेच अशा घटना घडत आहेत. संतत्तीच्या वादातून भाऊ भावाच्या जीवावर उठतो. भावकीतली माणसं एकमेकांवर चालून जातात. या घमासानमध्ये आपलीच माणसं आपल्या माणसाचा जीव घेतात किंवा त्यांना रक्तबंबाळ करुन जखमी करतात. गोंदिया जिल्ह्यात अशीच घटना घडली आहे. जमिनीच्या वादातून गोंदिया तालुक्यात धक्कादायक घटना समोर आली आहे. जमिनीच्या वादातून भावकीत झालेल्या भांडणात कुऱ्हाड चालल्याची घटना गोंदिया तालुक्यात घडली आहे. या मारहाणीत एकजण गंभीर जखमी झाला आहे. तर दोन जण किरकोळ जखमी झाले आहेत. या मारहाणीची घटना कॅमेऱ्यात कैद झाली आहे. विशेष म्हणजे घटनेचे व्हिडीओ सोशल मीडियावरही व्हायरल होत आहेत. (बलात्कार आणि जीवे ठार मारण्याची धमकी प्रकरण, शिवसेनेच्या केदार दिघेंना सर्वात मोठा दिलासा) संबंधित घटनेची दखल गोंदियाच्या ग्रामीण पोलिसांनी घेतली आहे. पोलिसांनी या प्रकरणी चार जणांना अटक केली आहे. यामध्ये एक पुरुष तर तीन महिलांचा समावेश आहे. पोलिसांनी चारही आरोपींवर गुन्हा दाखल केला आहे. गोंदिया तालुक्यातील तुमखेड़ा येथील नागपुरे कुटुंबात शेतजमीनीच्या वाद सुरू आहे. या कुटुंबीयांचा शेतात काम करताना वाद सुरु झाला. या दरम्यान मुकेश नागपुरे यांच्यासह तीन महिलांनी हनसहलाल नागपुरे यांच्यावर कुऱ्हाडीने वार केले. या हल्ल्यात ते गंभीर जखमी झाले आहेत. त्यांच्यावर सध्या गोंदिया येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत.
    Published by:Chetan Patil
    First published:

    Tags: Crime

    पुढील बातम्या