Home /News /crime /

1.65 कोटींची सोन्याची बिस्कीटं लपवली पोटात; नागपूरला जाताना अधिकाऱ्यांनी घेतलं ताब्यात

1.65 कोटींची सोन्याची बिस्कीटं लपवली पोटात; नागपूरला जाताना अधिकाऱ्यांनी घेतलं ताब्यात

हा तस्कर नागपूरच्या दिशेने प्रवास करीत होता.

    रायपुर, 20 जानेवारी : छत्तीसगडमधील रायपूरच्या रेल्वे स्टेशनवर (railway station in Chhattisgarh) दुरांतो ट्रेनमधून डायरेक्टर रेवेन्यू इंटेलिजेंस (DRI) च्या टीमने एका गोल्ड तस्करला पकडण्यात आलं आहे. मिळालेल्या माहितीनुसार, रायपुर आणि छत्तीसगडच्या अनेक सराफा व्यावसायिकांशी याचा संपर्क होता. गोल्डची एक मोठी डील होणारी होती, यापूर्वीही अधिकाऱ्यांच्या टीमने तस्कराला ट्रेस केलं आहे. (Gold worth Rs 1.65 crore seized at Raipur railway station) बांग्लादेशातून सोन्याच्या स्मगलिंगचा खुलासा DRI च्या टीमने सांगितलं की, हे सोनं बांग्लादेशातून आणण्यात आलं होतं. कलकत्यातून हा तस्कर सोनं घेऊन नागपूरला जाण्यासाठी निघाला होता. तस्करजवळ 3.33 किलो सोन्याची बिस्कीटं सापडली आहेत. हे बिस्कीट विविध साइजमध्ये आहेत. ज्यात एकाचा आकार मोबाइल फोन इतका आहे. याची किंमत 1.65 कोटी रुपयांची असल्याची शक्यता आहे. कमरेला लपवलं होतं सोनं... DRI च्या टीमने ज्या आरोपीला पकडलं आहे, त्याने आपल्या कमरेत एका कपड्याची पट्टी लावली होती. या कपड्याच्या पट्टीत सोन्याची बिस्कीटं लावली होती. तपासात जेव्हा व्यक्तीने आपल्या कमरेतून 1.65 कोटींची बेल्ट काढला आणि सोन्याची बिस्कीटंही बाहेर काढली. हे पाहून अधिकारीही हैराण झाले. हे ही वाचा-संसाराचं स्वप्न भंगलं! नवऱ्याला झोपेच्या गोळ्या देऊन नव विवाहिता फरार... DRI ला मिळाले सिंडिकेटची 5 मोठी नावं तस्करीच्या एका प्रकरणात डीआरआयच्या टीमला सिंडिकेटच्या 5 मोठ्या नावांचा समावेश आहे. ज्यांच्याविरोधात कारवाईची तयारी केली जात आहे. सांगितलं जात आहे की, सोन्याची डिल हवालाच्या माध्यमातून झाली आणि मोठा पेमेंट बांग्लादेश स्थित या सिंडिकेटच्या प्रमुखाला पाठवण्यात आला. नागपूरला जात होता तस्कर.. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, DRI च्या टीमने ज्या आरोपीला पकडलं आहे, ती व्यक्ती हावडावरुन नागपूरला जात होती. आता टीमकडून या तस्कराची चौकशी केली जात आहे.

    Published by:Meenal Gangurde
    First published:

    Tags: Gold, Nagpur

    पुढील बातम्या