भाजपच्या माजी महिला अध्यक्षाच्या मुलाची हत्या; भरदिवसा दुकानात घुसून भोसकल्याचा VIDEO आला समोर

भाजपच्या माजी महिला अध्यक्षाच्या मुलाची हत्या; भरदिवसा दुकानात घुसून भोसकल्याचा VIDEO आला समोर

भर दिवसा झालेल्या या हत्येमुळे गोवा हादरला. या घटनेचा VIDEO समोर आला आहे. जखमी अवस्थेतही प्रतिकार करणाऱ्या स्वप्नील वाळकेंबरोबरच यात हल्लेखोरही कैद झाले आहेत.

  • Share this:

पणजी, 2 सप्टेंबर: भाजपच्या दक्षिण गोवा इथल्या माजी महिला अध्यक्ष आणि राज्य कार्यकारणी सदस्या क्रिश्नी वाळके यांच्या मुलाची निर्घृण हत्या करण्यात आली आहे. स्वप्निल वाळके असं हत्या झालेल्या व्यक्तीचं नाव आहे. अज्ञात मारेकऱ्यानं ज्वेलरी शॉपमध्ये घुसून स्वप्निल वाळके यांच्यावर हल्ला केला.

दिवसाढवळ्या मडगावच्या भर रहदारीच्या रस्त्यावर ही घटना घडल्यानं गोवा हादरलं आहे. त्यातच या घटनेचा VIDEO समोर आल्याने खळबळ उडाली आहे. जखमी अवस्थेतही हल्लेखोरांचा प्रतिकार करताना स्वप्नील वाळके यात दिसतात. त्यांच्यावर पुन्हा वार करून पळून जाणारे हल्लेखोरही या VIDEO मध्ये कैद झाले आहेत.

स्वप्नील वाळके यांचं मडगाव शहरातील आबे फराह रोडवर क्रिश्नी ज्वेलरी शॉप आहे. बुधवारी सकाळी वाळके यांनी नेहमीप्रमाणे ज्वेलरी शॉप उघडलं होतं. दुपारच्या सुमारास दोन जणांनी दुकानात प्रवेश केला आणि धारदार शस्त्रांनी स्वप्नील यांच्यावर वार केले. मात्र, वाळके यांनी मारेकऱ्याच्या हाताला धक्का दिला.

तितक्यात दुसऱ्या मारेकऱ्यानं त्यांच्या पोटात चाकू भोसकला. गंभीर जखमी अवस्थेत स्वप्नील वाळके यांनी मारेकऱ्यांचा पाठलाग केला. ते दुकानाबाहेर रस्त्यापर्यंत आले आणि मारेकऱ्यांना पकडण्याचा प्रयन्न केला. मात्र, मारेकऱ्यांनी वाळके यांच्यावर पुन्हा हल्ला करून पळ काढला.

मारेकरी VIDEO त कैद...

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, स्वप्नील वाळके यांचे मारेकरी दुचाकी वरून आले होते. एकानं डोक्यावर हल्मेट घातलं होतं. प्रथमदर्शनी हा चोरीसाठी हत्येचा प्रकार असावा, असा प्राथमिक अंदाज आहे. पोलीस अधिक तपास करत असून तपासासाठी दोन पथकं तयार केली आहेत. परिसरातील CCTV टीव्ही कॅमेरा फूटेज आणि श्वान पथकाची मदत घेण्यात येत आहे.

Published by: अरुंधती रानडे जोशी
First published: September 2, 2020, 8:29 PM IST
Tags: goamadgaon

ताज्या बातम्या