मराठी बातम्या /बातम्या /क्राईम /

कुंकू घेऊन वडिलांच्या मृतदेहाबरोबर खेळत राहिल्या मुली; ड्यूटीवर गेली होती आई, भयंकर घटना  

कुंकू घेऊन वडिलांच्या मृतदेहाबरोबर खेळत राहिल्या मुली; ड्यूटीवर गेली होती आई, भयंकर घटना  

death

death

ते दृश्य पाहून अनेकांना धक्काच बसला.

  • Published by:  Meenal Gangurde

लखनऊ, 29 जुलै : उत्तर प्रदेशातील लखीमपूर खीरी भागातील हृदय पिळवटून टाकणारी घटना समोर आली आहे. या घटनेचा एक फोटोही समोर आला असून यात खोलीत दोन लहानग्या आपल्या वडिलांच्या मृतदेहासोबत खेळत आहेत.

यादरम्यान मुली आपल्या आईचं कुंकू वडिलांच्या मृतदेहाला लावत आहेत. जेव्हा त्यांच्या आईने हा प्रकार पाहिला तर तिला धक्काच बसला. काशीनगर भागात सरकारी डॉक्टर दाम्पत्य राजेश मोहन गुप्ता आणि डॉ. वीणा गुप्ता एका भाड्याच्या घरात गेल्या 5 वर्षांपासून राहतात. MBBS डॉक्टर राजेश मोहन गुप्ता शहरापासून साधारण 3 किमी अंतरावर बाजूडीहा गावात तैनात होते. तर त्यांची पत्नी शहरातील सीएससीमध्ये तैनात आहे.

दररोज प्रमाणे 26 जुलै रोजी दुपारी 1.30 वाजता वीणा गुप्ता आपल्या घरी येते. दरवाजा बंद असल्याने ती पतीला आवाज देते. जोरजोरात दार ठोठावते. मात्र आतून काहीच आवाज येत नाही. शेवटी काही जणांना बोलावून दरवाजा तोडतात. आतील दृश्य पाहून सर्वजण हैराण होतात.

डॉक्टर वीणा गुप्ता सांगते की, जेव्हा दरवाजा उघडला तर पती बेडवर बेशुद्धावस्थेत पडलेला होता आणि जुळ्या मुली आपले हात, गालांवर कुंकू लावून वडिलांच्या अंगावर खेळत होते. मुलींनी आपल्या वडिलांच्या पोटावर, पायावर कुंकू लावलं होतं.

हे सर्व पाहून त्यांची पत्नी आरडाओरडा सुरू करते. पतीला हृदयविकाराचा झटका आल्याचा संशय असल्याने ती सीपीआर देण्याचा प्रयत्न करते. पोलिसांना या घटनेबद्दल कळताच ते दाखल होतात आणि डॉक्टरांना रुग्णालयात घेऊन जातात. मात्र डॉक्टर त्यांना मृत घोषित करतात. पोस्टमार्टम रिपोर्टमध्ये हृदयविकाराच्या झटक्यामुळे त्यांचा मृत्यू झाल्याचं समोर आलं आहे.

First published:

Tags: Crime news, Heart Attack, Uttar pardesh