मुलीची छेड काढल्याचा राग, वडिलांनी दिवसा ढवळ्या केली तरुणाची हत्या

मुलीची छेड काढल्याचा राग, वडिलांनी दिवसा ढवळ्या केली तरुणाची हत्या

सचिन हा नामदेव यांच्या मुलीला वारंवार त्रास देत होता. त्रासलेल्या नामदेव यांनी बदलापुरातील सुरवळ चौकात सचिनची तीक्ष्ण हत्याराने भोसकून हत्या केली.

  • Share this:

बदलापूर 22 जानेवारी : बदलापुरात दिवसा ढवळ्या एका 67 वर्षाच्या वृद्धाने 26 वर्षीय तरुणाची हत्या केलीय. या हत्येने परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. मुलीला सतत त्रास देत असल्याने त्रासलेल्या वडिलांनी ही हत्या केल्याची प्राथमिक माहिती समोर आलीये. विशेष म्हणजे हत्या केल्या नंतर आरोपी हातात सुरा घेऊन जात असतानाचा व्हिडीओसुद्धा व्हायरल झाल्याचं बोललं जातंय. नामदेव कोइंडे असं आरोपीचं नाव असून पोलिसांनी त्याला अटक केलीय. बदलापुरातील शिरगांव भागातील वर्दळीच्या सुरवळ चौकात दुपारच्या सुमारास हा थरार घडला. भर दुपारी सचिन शिंदे या 26 वर्षीय तरुणाची निर्घृण हत्या करण्यात आली.

धक्कादायक म्हणजे एका 67 वर्षीय नामदेव कोइंडे या वृद्धाने ही हत्या केली. सचिन हा आरोपीच्या मुलीला वारंवार त्रास देत होता. बदलापूर पोलीस ठाण्यातही या आधी हे प्रकरण गेले होते. मात्र तरी देखील सचिनचा त्रास सुरूच होता. सचिनच्या कृत्याने त्रासलेल्या नामदेव यांनी बदलापुरातील सुरवळ चौकात सचिनची तीक्ष्ण हत्याराने भोसकून हत्या केली.

मुंबईच्या तरुणाची साताऱ्यामध्ये हत्या, पुरावे मिटवण्यासाठी केलं धक्कादायक कृत्य

विशेष म्हणजे ही हत्या केल्या नंतर नामदेव हा सुरा हातात घेऊन फिरत असल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय. या हत्येची माहिती मिळताच बदलापूर पोलीस आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांनी घटनास्थळाची पाहणी करून घटनेचा पंचनामा केला. पोलिसांनी सचिनचा मृतदेह ताब्यात घेतला असून शवविच्छेदनासाठी पाठवला आहे.

मुंबईत आणखी एक हायप्रोफाईल सेक्स रॅकेट उघड, अभिनेत्रीसह 2 रशियन मॉडेल ताब्यात

या प्रकरणी बदलापूर पूर्व पोलीस ठाण्यात हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मात्र गेल्या दोन दिवसात उल्हासनगर आणि बदलापूर या शहरात सलग दोन हत्या झाल्याने परिमंडळ 4 मधील कायदा आणि सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे.

First published: January 22, 2020, 5:36 PM IST

ताज्या बातम्या