अनुज गुप्ता, प्रतिनिधी
उन्नाव, 22 मार्च : देशात दिवसेंदिवस गुन्हेगारीच्या घटना वाढत आहेत. हत्या, आत्महत्या, तसेच प्रेम प्रकरणातून खुनाच्याही धक्कादायक घटना समोर येत आहेत. त्यातच आता आणखी एक धक्कादायक घटना समोर आली आहे. उत्तर प्रदेशातील उन्नावमध्ये तीन दिवसांपूर्वी झालेल्या एका मुलीच्या हत्येचा खुलासा पोलिसांनी केला आहे.
आरोपी प्रियकराने प्रेयसीला शौचाच्या बहाण्याने घरातून बोलावले आणि तिच्यावर लग्नासाठी दबाव टाकण्यास सुरुवात केली. मात्र, प्रेयसीने लग्नास नकार दिल्याने आरोपी प्रियकराने तिची गोळ्या झाडून हत्या केली. घटनेनंतर आरोपी प्रियकर घटनास्थळावरून पळून गेला. तर त्याचा फोन घटनास्थळीच होता. यामुळे या हत्या प्रकरणाचा उलगडा करण्यास मदत झाली.
दरम्यान, पोलिसांनी आरोपीला अटक करून त्याची कारागृहात रवानगी केली आहे. आरोपी हा नात्यातील मृताचा चुलत भाऊ असल्याचे समजते. उन्नावमधील बिघापूर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील भैसई कोयल गावातील ही धक्कादायक घटना आहे.
याठिकाणी एका 20 वर्षांची तरुणी 19 मार्च रोजी सकाळी 8 वाजता गावाबाहेरील शेतात शौच करण्यासाठी गेली होती. तासाभरानंतरही ती न परतल्याने नातेवाईकांनी तिचा शोध सुरू केला. मात्र, यानंतर तिचा मृतदेह गावाबाहेर तलावाजवळ आणि झुडपांमध्ये रक्ताने माखलेला आढळून आला. दरम्यान, या मुलीच्या हत्येच्या घटनेने खळबळ उडाली आहे.
गावातील तरुणीशी प्रेमप्रसंग अंगलट, तरुणाला विटा ठेवून तलावात डुबवलं, घडलं भयानक
एसपी सिद्धार्थ शंकर मीणा यांनी अतिरिक्त एसपी शशी शेखर सिंह यांच्याकडे तपास सोपवला. याप्रकरणी त्यांनी तपास केला असता, धक्कादायक खुलासा झाला. सिंह यांच्या नेतृत्वाखाली बिघापूरचे सीओ विजय आनंद, एसओजी आणि फॉरेन्सिक टीमने तपास सुरू केला असता पाळत ठेवणाऱ्या पथकाकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी मृताच्या चुलत भावाला ताब्यात घेतले.
यावेळी सिंह यांनी सांगितले की, पोलिसांच्या चौकशीत चुलत भाऊ राजेश हा मुलीच्या हत्येचा आरोपी असल्याचे निष्पन्न झाले. पोलीस चौकशीत राजेशने सांगितले की, मृत मुलगी आणि त्याचे बरेच दिवसांपासून प्रेमसंबंध सुरू होते आणि त्याला तिच्याशी लग्न करायचे होते. परंतु प्रेयसीला दुसऱ्या ठिकाणी लग्न करायचे असल्याने प्रेयसी सतत नकार देत होती. आरोपी प्रियकराला याची माहिती मिळताच त्याने ही हत्या केली. सध्या पोलिसांनी आरोपी राजेशला अटक करून त्याची कारागृहात रवानगी केली आहे, तसेच याप्रकरणी पोलीस पुढील कारवाई करत आहेत.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Crime news, Local18, Murder, Relationships, Uttar pradesh