Ex-boyfriend ला पार्टीत बोलवून तरुणीनं केलं असं काही, वाचून बसेल धक्का

Ex-boyfriend ला पार्टीत बोलवून तरुणीनं केलं असं काही, वाचून बसेल धक्का

आधी गर्लफ्रेंड (Girlfriend) बॉयफ्रेंड असणारी जोडपीच पुढे एकमेकांचे शत्रू झाल्याचं अनेकदा आजवर आपण ऐकलं असेल. मात्र, आता उत्तर प्रदेशच्या गाजियाबादमधून एक अशी घटान समोर आली आहे, जी ऐकून तुम्हालाही धक्का बसेल.

  • Share this:

गाजियाबाद 16 फेब्रुवारी : आधी गर्लफ्रेंड बॉयफ्रेंड असणारी जोडपीच पुढे एकमेकांचे शत्रू झाल्याचं अनेकदा आजवर आपण ऐकलं असेल. मात्र, आता उत्तर प्रदेशच्या गाजियाबादमधून एक अशी घटान समोर आली आहे, जी ऐकून तुम्हालाही धक्का बसेल. एका मुलीनं आपल्या 26 वर्षांच्या एक्स बॉयफ्रेंडला (Ex Boyfriend) स्वतःच्या घरी पार्टीसाठी बोलावलं आणि आपल्या होणाऱ्या नवऱ्यासोबत  (Fiance) मिळून त्याची हत्या (Murder) केली. पोलिसांनी (Police) सांगितलं, की घटनेनंतर आरोपी तरुणी आणि तिचा होणार नवरा फरार झाले असून त्यांचा तपास सुरू आहे.

ही घटना दिल्लीजवळील गाजियाबादच्या वैशाली सेक्टर 4 मधील आहे. हत्या झालेल्या तरुणाचं नाव नितीन चौधरी असून तो बीकॉमचं शिक्षण घेत होता. पोलिसांनी सांगितलं, की शेजाऱ्यांनी फ्लॅटमधून दुर्गंध येत असल्याची तक्रार केली होती, यानंतर पोलिसांनी कारवाई करत मृतदेह बाहेर काढला. या घटनेनंतर पोलिसांनी एका व्यक्तीला ताब्यात घेतलं आहे. या व्यक्तीला फ्लॅटच्या मालकानं घर भाड्यानं देण्यासाठी घराची चावी दिली होती. फ्लॅटच्या मालकानं सांगितलं, की त्यांनी आपल्या हा फ्लॅट भाड्यानं देण्यासाठी मित्राला त्याची चावी दिली होती.

4 वर्षाच्या रिलेशनशिपनंतर झालं होतं ब्रेकअप -

पोलिसांनी सांगितलं, की नितीन चौधरी आणि तरुणी जवळपास 4 वर्ष रिलेशनशिपमध्ये होते. मात्र, दोन महिन्यांपूर्वी त्यांचा ब्रेकअप झाला. यादरम्यान तरुणीचं दुसऱ्या एका व्यक्तीसोबत लग्न ठरलं आणि तिचा साखरपुडाही झाला. मात्र, नितीन हे नातं तोडण्यास तयार होत नव्हता. तो मुलीवर लग्नासाठी दबाव टाकत होता आणि याचाच तिला त्रास होत होता.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नितीन संबंधित तरुणीला वारंवार त्रास देत होता. यामुळं तिनं होणाऱ्या नवऱ्यासोबत मिळून त्याला रस्त्यातून बाजूला करण्याचा कट रचला. तरुणीनं नितीनला आपल्या घरी पार्टीसाठी बोलवलं, तिथे तिचा होणारा पती सनीदेखील होता. पार्टीमध्ये तिघांनीही दारू पिली आणि यानंतर तरुणीनं होणाऱ्या नवऱ्यासोबत मिळून नितीनची हत्या केली. यानंतरपासूनच आरोपी तरुणी आणि तिचा होणारा पती फरार आहेत.

Published by: Kiran Pharate
First published: February 16, 2021, 3:04 PM IST

ताज्या बातम्या