होणाऱ्या बायकोच्या फेक मेसेजनं घेतला तरुणाचा जीव, लग्नाच्या 2 महिने आधी उद्ध्वस्त झाला संसार

होणाऱ्या बायकोच्या फेक मेसेजनं घेतला तरुणाचा जीव, लग्नाच्या 2 महिने आधी उद्ध्वस्त झाला संसार

तरुणीनं होणाऱ्या नवऱ्याला धमकीचा मेसेज केला आणि तो मेसेज वाचून तिच्यावर जीवापाड प्रेम करणाऱ्या तरुणाला मोठा धक्काच बसला आणि त्यानं टोकाचं पाऊल उचललं.

  • Share this:

इंदौर, 12 जानेवारी : लग्नाची हातावर मेहंदी आणि नव्या पर्वाची सुरुवात करण्याचं स्वप्न होतं. हळद लागण्याआधीच एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका भांडणानं आणि खोट्या मेसेजनं प्रेमाचा शेवट केला आहे. प्रेमी युगुलात फोनवर तुफान वाद झाला. त्या वादानंतर जे घडलं त्यानं परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.

तरुणीनं होणाऱ्या नवऱ्याला धमकीचा मेसेज केला आणि तो मेसेज वाचून जीवापाड प्रेम करणाऱ्या तरुणाला मोठा धक्काच बसला. त्यानं हा मेसेज वाचल्यानंतर स्वत: गळफास घेऊन आत्महत्या केल्यानं मोठी खळबळ उडाली आहे. या दोघांचं मार्च महिन्यात लग्न होणार होतं. मात्र हे स्वप्न एका खोट्या मेसेजमुळे तरुणाच्या जीवावर बेतलं.

तरुणीनं मेसेजमध्ये मी विष घेऊन जीव देईन अशी धमकी दिली होती. हा धमकीचा मेसेज वाचून तिच्यावर प्रेम करणाऱ्या आणि होणाऱ्या नवऱ्यानं गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. या घटनेची माहिती पोलिसांना मिळताच ते घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मध्य प्रदेशातील इंदूरमधील बाबा फरीद नगर येथे राहणाऱ्या गुल्लू उर्फ ​​अनसला त्याच्या वडिलांनी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केलं. मात्र तोपर्यंत खूप उशीर झाला होता. डॉक्टरांनी या तरुणाला ममृत घोषित केलं आहे.

हे वाचा-नागपूरहून पुण्याकडे येत असताना धावत्या बसमध्ये तरुणीवर 2 वेळा बलात्कार

गुल्लूच्या घरासमोर राहणाऱ्या तरुणीवर त्याचं प्रेम जडलं. या दोघांचं लग्न 15 मार्च रोजी पार पडणार होतं. सोमवारी या दोघांमध्ये फोनदरम्यान वाद झाला आणि तिने विष घेण्याची धमकी मेसेजवर दिली. त्याचा राग डोक्यात घेऊन तरुणानं आत्महत्या केल्याची माहिती समोर आली आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. या तरुणीनं मेसेजमध्ये म्हटल्यानुसार विष प्राशन केलं तर नाहीच केवळ धमकी दिली होती. मात्र तिच्या या धमकीमुळे तरुणाचा जीव गेला आहे.

Published by: Kranti Kanetkar
First published: January 12, 2021, 4:16 PM IST
Tags: Indore

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading