मराठी बातम्या /बातम्या /क्राईम /3 महिन्यांच्या चिमुकलीला लोखंडी सळईचे चटके; अंधश्रद्धेमुळे गेला जीव

3 महिन्यांच्या चिमुकलीला लोखंडी सळईचे चटके; अंधश्रद्धेमुळे गेला जीव

कुटुंबीयांची अंधश्रद्धा आणि भोंदू बाबाच्या कृत्याने एका तीन महिन्यांच्या चिमुरडीचा जीव गेल्याची संतापजनक घटना समोर आली आहे.

कुटुंबीयांची अंधश्रद्धा आणि भोंदू बाबाच्या कृत्याने एका तीन महिन्यांच्या चिमुरडीचा जीव गेल्याची संतापजनक घटना समोर आली आहे.

कुटुंबीयांची अंधश्रद्धा आणि भोंदू बाबाच्या कृत्याने एका तीन महिन्यांच्या चिमुरडीचा जीव गेल्याची संतापजनक घटना समोर आली आहे.

  • Trending Desk
  • Last Updated :
  • Delhi, India

    नवी दिल्ली, 4 फेब्रुवारी :  वैद्यकीय क्षेत्रात खूप प्रगती झाली असली तरी आरोग्याशी संबंधित अडचणींबद्दल देशाच्या काही भागांमध्ये अजूनही अंधश्रद्धा पाळली जाते. अनेक ठिकाणी उपचारांसाठी डॉक्टरांऐवजी भोंदू बाबा किंवा मांत्रिक यांची मदत घेतली जाते. परिणामी, वेळीच उपचार न मिळाल्याने अनेकांना जीव गमवावा लागतो. अशीच एक घटना मध्य प्रदेश राज्यातील शहडोलमध्ये घडली आहे. या ठिकाणी कुटुंबीयांच्या अंधश्रद्धेमुळे एका तीन महिन्यांच्या मुलीला जीव गमवावा लागला आहे.

    पोटावर गरम सळईचे चटके  

    कुटुंबीयांची अंधश्रद्धा आणि भोंदू बाबाच्या कृत्याने एका तीन महिन्यांच्या चिमुरडीचा जीव घेतला आहे. न्यूमोनियाने पीडित मुलीवर उपचार करण्याच्या नावाखाली एका भोंदू वैद्याने तिच्या पोटावर गरम सळईचे तब्बल 51 चटके दिले. यामुळे मुलीची प्रकृती बरी होण्याऐवजी बिघडली. यानंतर नातेवाईकांनी तिला रुग्णालयात दाखल केलं, मात्र त्या चिमुरडीचा जीव वाचू शकला नाही. जिल्हाधिकाऱ्यांनी या प्रकरणाच्या चौकशीचे आदेश दिले आहेत.

    सिंहपूर कठौतिया गावातील घटना 

    ही घटना शहडोल जिल्ह्यातील सिंहपूर कठौतिया इथली आहे. न्यूमोनियामुळे मुलीला श्वास घेण्यास त्रास होत होता. कुटुंबीय तिला भोंदू वैद्याकडे घेऊन गेले. त्या वैद्याने मुलीच्या पोटावर 51 वेळा गरम सळईचे चटके दिल्यामुळे मुलीची प्रकृती बिघडली. गरम सळईने चटके दिल्याने बाळाच्या मेंदूमध्ये इन्फेक्शन पसरल्याचे डॉक्टरांनी सांगितले. तिची प्रकृती जास्त बिघडल्यानंतर कुटुंबीयांनी तिला रुग्णालयात दाखल केलं. पण, उपचारांदरम्यान तिचा मृत्यू झाला.

    हेही वाचा : Pune : शिंदे गटाच्या नेत्याच्या पत्नीने स्वतःला संपवलं; पुण्यात खळबळ

    अंगणवाडी सेविकेचंही ऐकलं नाही

    अंगणवाडी सेविकेने मुलीच्या आईला दोनदा समजावून सांगत अंधश्रद्धेला बळी न पडण्याचा सल्ला दिला होता, असं शहडोलच्या जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितलं. यानंतरही कुटुंबीयांनी मुलीला त्या वैद्याकडे नेले. त्याने तिला गरम सळईने चटके दिले. या संदर्भातील आरोपांची चौकशी करण्याचे आदेश देण्यात आल्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले. तसेच गुन्हा दाखल करून दोषींवर कारवाई केली जाईल, असंही ते म्हणाले.

    चिमुरडीचा मृत्यू 

    कुटुंबीयांच्या अंद्धश्रद्धेपोटी एका तीन महिन्याच्या चिमुरडीला जीव गमवावा लागला आहे. तिला वेळीच रुग्णालयात नेलं असतं तर कदाचित तिचा जीव वाचला असता, पण कुटुंबीयांनी घरच्यांऐवजी तिला भोंदू बाबाकडे नेलं. या घटनेनंतर संताप व्यक्त केला जात आहे. तसेच प्रकरण जिल्हाधिकाऱ्यांकडे पोहोचलं असून त्यांनी प्रकरणाची चौकशी करून दोषींवर कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत.

    First published:

    Tags: Crime