मराठी बातम्या /बातम्या /क्राईम /

जीवे मारण्याची धमकी देत रिसॉर्टमध्ये नेलं, नंतर बळजबरी, मामेभावानेच असं का केलं?

जीवे मारण्याची धमकी देत रिसॉर्टमध्ये नेलं, नंतर बळजबरी, मामेभावानेच असं का केलं?

पवनी पोलीस ठाणे

पवनी पोलीस ठाणे

नातेसंबंधातील 19 वर्षीय तरुणीला फिरायला जाऊ, असा बहाणा करून एका तरुणाने तरुणीला भंडारा जिल्ह्याच्या पवनीच्या रिसॉर्टवर नेत संतापजनक कृत्य केलं.

  • Published by:  Chetan Patil
नेहाल भुरे, भंडारा, 12 ऑगस्ट : नातेसंबंधातील 19 वर्षीय तरुणीला फिरायला जाऊ, असा बहाणा करून एका तरुणाने तरुणीला भंडारा जिल्ह्याच्या पवनीच्या रिसॉर्टवर नेले. त्यानंतर तिथे जीवे मारण्याची धमकी देत तिच्यावर बळजबरी केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या प्रकरणी पवनी पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. विशेष म्हणजे भंडारा जिल्ह्यातील सामूहिक अत्याचाराच्या घटनेने राज्यात खळबळ उडाली असतानाच या नव्या प्रकरणाने जिल्हा हादरला आहे. सोनू सुरेश नान्हे (22) असे अत्याचार प्रकरणी अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. पोलिसांनी या आरोपीला बेड्या ठोकल्या आहेत. आरोपी सोनू हा पीडितेच्या चुलत मामाचा मुलगा आहे. पीडिता ही भंडारा तालुक्यातील असून तिला दोन मामा आहेत. ते पवनी येथे राहतात. त्यांच्या घराशेजारी चुलत मामा सुरेश नान्हे राहतात. पीडिता ही अधूनमधून मामाकडे पवनीला जात असे. त्यामुळे तिची आरोपी सोनूसोबत ओळख निर्माण झाली. त्यातून दोघांकडे एकमेकांचे मोबाईल नंबर असल्याने ते मागील अडीच वर्षांपासून संपर्कात होते. (बीडमध्ये 7 अधिकारी, 70 पोलिसांना तपासात मोठं यशं, धाडसी दरोडा टाकणाऱ्या नराधमांचा पापाचा घडा भरला, थरारक तपास) आरोपी सोनू हा 7 ऑगस्टला पीडितेच्या गावातील शाळेजवळ पोहचला. तिथून त्याने फोन करून पीडितेला फिरायला जाऊ असे सांगितले. नकार दिल्यानंतरही आरोपीने तिला भुलथापा देत दुचाकीवर बसवून फिरायला नेले. त्यानंतर लाखांदूर येथील दुर्गा मंदिरात तिला नेऊन तिथे सायंकाळपर्यंत दोघेही थांबले. रात्र होत असल्याने त्याने पीडितेला चप्राड येथे त्याच्या बहिणीकडे भाऊजीला बोलावून पोहोचवले. दुसऱ्या दिवशी 8 ऑगस्टला आरोपी सोनवणे पीडितेला लाखांदूर येथून पवनीला आणले. आरोपीने तहसील कार्यालयाजवळील टायगर रिसॉर्ट मधील 102 नंबरची रूम बुक करून तिथे तिला जिवे मारण्याची धमकी देत तिच्यावर बळजबरीने अत्याचार केला. दरम्यान, पीडितेने विरोध केला असता ही बाब कुणाला सांगितल्यास जीवे मारून टाकेल, अशी धमकी दिली. रात्री 10 वाजताच्या सुमारास सोनूने चारचाकी वाहनाने पीडितेला शाळेजवळ सोडल्याचे तक्ररीत नमूद आहे. घरी पोहोचताच पीडितेने घडलेला प्रकार आई-वडिलांना सांगितला. याप्रकरणी पीडितेने मंगळवारी कारधा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. मात्र, घटनास्थळ हे पवनी येथील असल्याने प्रकरण वर्ग करण्यात आले. याप्रकरणी पवनी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून आरोपीला अटक केली आहे. या प्रकरणी पवनी पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे.
First published:

Tags: Bhandara Gondiya, Crime, Rape

पुढील बातम्या