दिल्ली, 24 जानेवारी: दिल्लीपासून (Delhi) 60 किमी दूर असलेल्या पलवलमध्ये (Palwal) एक धक्कादायक घटना घडली आहे. आपल्या प्रेम संबंधाची (Love affair) माहिती घरी कळेल, या भितीपोटी एका तरुणीने आपल्या बॉयफ्रेन्डच्या (Boyfriend) मदतीने मैत्रिणीचीच हत्या (Friend Murder) घडवून आणली आहे. या हत्येच्या घटनेमुळे आसपासच्या परिसरात खळबळ उडाली आहे. या प्रकरणात पोलिसांनी आरोपी तरुणीला अटक केली असून तिचा बॉयफ्रेन्ड अद्याप फरार आहे. पोलीस आरोपी बॉयफ्रेन्डचा शोध घेत आहेत.
या प्रकरणातील आरोपी तरुणीचं नाव ज्योती असून तिने बॉयफ्रेन्ड पवनच्या मदतीने मैत्रीण ऋतुची हत्या केली आहे. ऋतु ही BSC च्या शेवटच्या वर्षात शिकत होती. मृत ऋतुला आरोपी ज्योती आणि पवन यांच्या प्रेमसंबंधाबद्दल काळालं होतं. मृत ऋतु आपल्या प्रेम संबंधाची वाच्यता घरच्यांपुढे करेल, या भितीपोटी ज्योतीने ऋतुच्या हत्येचा कट रचला. त्यासाठी तिने गुरुवारी सकाळी नऊ वाजता कॉलेजला जाण्यासाठी ऋतुच्या घरी गेली होती.
हे ही वाचा-वारंवार केलं जात होतं घृणास्पद कृत्य, 10 वीच्या विद्यार्थिनीची आत्महत्या
त्यानंतर आरोपी ज्योतीने बॉयफ्रेन्ड पवनच्या मदतीने ऋतुची गळा दाबून हत्या केली आणि तिचा मृतदेह आग्रा कॅनेलच्या एका झाडीत टाकून दिला. या घटनेनंतर आरोपी घटनास्थळावरून फरार झाले. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेवून मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवून दिला. तसे पोलिसांनी आरोपींच्या विरोधात हत्या आणि इतर कलमांच्या अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी पोलिसांनी आरोपी मैत्रिणीला अटक केली आहे. तिचा प्रियकर अद्याप फरार असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत.
मृत ऋतुचे वडील रमेश चंद यांनी याप्रकरणी पोलिसांत गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांत दिलेल्या तक्रारीत त्यांनी सांगितलं की, त्यांची मोठी मुलगी ऋतु BSC च्या अंतिम वर्षात शिकत होती. गुरुवारी सकाळी नऊ वाजता ती मैत्रीण ज्योतीसोबत घरून कॉलेजला गेली होती. याच माहितीच्या आधारे पोलिसांनी घटनेचा तपास केला आणि हत्येचं गुढ उलगडलं आहे.