मराठी बातम्या /बातम्या /क्राईम /

Shocking! मैत्रिणींसोबत फिरायला गेलेल्या तरुणीचं अपहरण करून सामूहिक बलात्कार

Shocking! मैत्रिणींसोबत फिरायला गेलेल्या तरुणीचं अपहरण करून सामूहिक बलात्कार

एपीएमसी परिसरातील गटारामध्ये एक पिशवी आढळून आली होती. या पिशवीतून दुर्गंधी येत होती.

एपीएमसी परिसरातील गटारामध्ये एक पिशवी आढळून आली होती. या पिशवीतून दुर्गंधी येत होती.

घाबरलेल्या पीडित तरुणीने घडलेली घटना घरी सांगितली नाही. अनेक दिवस ती गप्पच राहिली होती.

  • Published by:  Sunil Desale

बरेली, 5 जून: उत्तरप्रदेशातील बरेलीतून (Bareli, Uttar Pradesh) एक धक्कादायक घटना समोर आली आहे. आपल्या मैत्रिणींसोबत स्कूटीवर फिरायला गेलेल्या तरुणीचं अपहरण झालं. इतकेच नाही तर आरोपींनी तिच्यावर सामूहिक बलात्कार केल्याचा प्रकार समोर आला आहे. आरोपींनी पीडित तरुणीला आणि तिच्या मैत्रिणीला बेदम मारहाण केली. त्यानंतर पीडित तरुणीला एका अज्ञातस्थळी नेलं. मग आरोपींनी तिच्यावर सामूहिक बलात्कार (Girl kidnapped and gangraped) केला. या प्रकरणी इज्जतनगर पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पीडित मुलीच्या भावाने सांगितले की, 31 मे रोजी त्याची बहिण घराबाहेर पडली होती. स्कूटीवर बाहेर फिरायला गेली असता इज्जतनगर परिसरातील भगवानपूर धिमरी येथे पाच ते सहा जणांच्या टोळक्याने पीडित मुलगी आणि तिच्या मैत्रिणींना थांबवले. त्यानंतर त्यांनी मारहाण करण्यास सुरूवात केली.

भाजप नगरसेवकाचं धक्कादायक कृत्य; भररस्त्यात महिला तलाठीला मारहाण, Video सोशल मीडियावर व्हायरल

आरोपींनी चाकूचा धाक दाखवत सर्वांना मारण्याची धमकी दिली आणि पीडित मुलीचं अपहरण केलं. यानंतर एका अज्ञातस्थळी नेत तिच्यावर आळीपाळीने बलात्कार केला. या घटनेनंतर पीडित मुलगी खूपच घाबरलेली होती. तिने आपल्या कुटुंबियांना घडलेला प्रकार सांगितला नाही.

अखेर शनिवारी पीडित मुलीने घडलेला प्रकार आपल्या बहिणीला सांगितला आणि त्यानंतर सर्वांनाच एक धक्का बसला. मग पीडित मुलीने आपल्या कुटुंबियांसह पोलीस ठाण्यात दाखल होत तक्रार दाखल केली.

या घटनेप्रकरणी वरिष्ठ पोलीस अधिक्षक रोहित सिंह सजवाण यांनी सांगितले की, पीडित तरुणीच्या तक्रारीनुसार, आरोपींच्या विरोधात एफआयआर दाखल करण्यात आला आहे. आरोपींना पकडण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत.

First published:

Tags: Crime, Uttar pradesh