मराठी बातम्या /बातम्या /क्राईम /

किरकोळ कारणावरून शेजाऱ्याने अंगावर सोडला कुत्रा, 8 वर्षांच्या मुलीचे तोडले लचके

किरकोळ कारणावरून शेजाऱ्याने अंगावर सोडला कुत्रा, 8 वर्षांच्या मुलीचे तोडले लचके

किरकोळ वादातून शेजाऱ्याने एका 8 वर्षांच्या मुलीवर (Neighbor's pet dog bite 8 year old girl) पाळीव कुत्रा सोडल्यामुळे मुलगी रक्तबंबाळ झाली

किरकोळ वादातून शेजाऱ्याने एका 8 वर्षांच्या मुलीवर (Neighbor's pet dog bite 8 year old girl) पाळीव कुत्रा सोडल्यामुळे मुलगी रक्तबंबाळ झाली

किरकोळ वादातून शेजाऱ्याने एका 8 वर्षांच्या मुलीवर (Neighbor's pet dog bite 8 year old girl) पाळीव कुत्रा सोडल्यामुळे मुलगी रक्तबंबाळ झाली

  • Published by:  desk news

ग्वालियर, 29 सप्टेंबर : किरकोळ वादातून शेजाऱ्याने एका 8 वर्षांच्या मुलीवर (Neighbor's pet dog bite 8 year old girl) पाळीव कुत्रा सोडल्यामुळे मुलगी रक्तबंबाळ झाली. तिची छोटी बहीण घाबरून कुलरच्या (Younger sister hide behind cooler) मागे लपून बसल्यामुळे वाचली. ही घटना समजताच कुटुंबीयांनी मुलीला हॉस्पिटलमध्ये दाखल केलं असून शेजाऱ्याविरोधात (Police complaint against neighbor) तक्रार नोंदवली आहे.

अशी घडली घटना

मध्यप्रदेशच्या ग्वालियरमध्ये एका सोसायटीत दीपक कुमार जैन हे कुटुंबासह राहतात. त्यांना 8 वर्षांची आणि 5 वर्षांची अशा दोन मुली आहेत. त्यांच्या शेजारी राहणाऱ्या अनिल शर्माचं दीपक जैन यांच्यासोबत काही दिवसांपूर्वी भांडण झालं होतं. अनिल यांनी त्यांच्याकडे असणारा कुत्रा गच्चीवर सोडू नये कारण तिथं लहान मुलं खेळत असतात, असं दीपक यांनी सांगितलं होतं. त्यावरून अनिल यांनी वाद घालत दीपक यांना शिविगाळ केली होती.

अंगावर सोडला कुत्रा

गच्चीवर नेहमीप्रमाणे 8 वर्षांची परी आणि तिची 5 वर्षांची छोटी बहीण खेळत होत्या. त्यावेळी अनिल आपल्या कुत्र्याला घेऊन आला आणि त्याने परीच्या अंगावर कुत्रा सोडला. त्या कुत्र्याने परीवर हल्ला केला आणि तिच्या अंगाचे लचके तोडायला सुरुवात केली. हे पाहून घाबरलेली परीची धाकटी बहीण गच्चीवरील कूलरच्या पाठिमागे लपून बसली. परीचा आरडाओरडा ऐकून तिचे कुटुंबीय आणि इतर शेजारी धावत गच्चीवर आले आणि त्यांनी परीची कुत्र्याच्या तावडीतून सुटका केली.

हे वाचा - थरारक! या गावात पसरलीय ‘खुनी साधू’ची दहशत, उचललाय 9 जणांच्या हत्येचा विडा

अनिलने दिली धमकी

कुटुंबीयांनी या प्रकाराबद्दल अनिलला जाब विचारला असला त्याने दीपक यांनाच ठार मारण्याची धमकी दिली. यावेळी मोठ्या मुलीवर सोडला, पुढच्या वेळी छोट्या मुलीवर कुत्रा सोडेने, अशी धमकी अनिलनं दिल्याचं दीपक यांनी पोलीस तक्रारीत म्हटलं आहे. कुटुंबीयांनी परीला हॉस्पिटलमध्ये दाखल केल्यानंतर छोटी बहीण गायब असल्याचं लक्षात आलं. तिचा शोध घेतला असता ती कूलरच्या मागे लपून बसलेली दिसली. पोलिसांनी या प्रकरणी अनिलवर गुन्हा दाखल केला असून पोलीस अधिक तपास करत आहेत.

First published:

Tags: Crime, Dog, Small girl