मराठी बातम्या /बातम्या /क्राईम /

मैत्रिणीच्या वडिलांसोबत लग्नास नकार दिल्याने क्रूर शिक्षा; भुवया कापल्या, चप्पल चाटण्यास पाडलं भाग अन् मग..

मैत्रिणीच्या वडिलांसोबत लग्नास नकार दिल्याने क्रूर शिक्षा; भुवया कापल्या, चप्पल चाटण्यास पाडलं भाग अन् मग..

एका महाविद्यालयीन विद्यार्थिनीला तिच्या मैत्रिणीच्या वडिलांसोबत लग्न (Marriage With Friend's Father) करण्यास नकार दिल्याने छळ आणि लैंगिक अत्याचाराचा सामना करावा लागला.

एका महाविद्यालयीन विद्यार्थिनीला तिच्या मैत्रिणीच्या वडिलांसोबत लग्न (Marriage With Friend's Father) करण्यास नकार दिल्याने छळ आणि लैंगिक अत्याचाराचा सामना करावा लागला.

एका महाविद्यालयीन विद्यार्थिनीला तिच्या मैत्रिणीच्या वडिलांसोबत लग्न (Marriage With Friend's Father) करण्यास नकार दिल्याने छळ आणि लैंगिक अत्याचाराचा सामना करावा लागला.

  • Published by:  Kiran Pharate
कराची 18 ऑगस्ट : पाकिस्तानातील पंजाब प्रांतातून एक लाजिरवाणी घटना समोर आली आहे. यात एका महाविद्यालयीन विद्यार्थिनीला तिच्या मैत्रिणीच्या वडिलांसोबत लग्न करण्यास नकार दिल्याने छळ आणि लैंगिक अत्याचाराचा सामना करावा लागला. तिच्या मैत्रिणीच्या वडिलांसह इतरांनी मिळून विद्यार्थिनीचे केस आणि भुवया कापल्या. यासोबतच 10 लाख रुपये न दिल्यास संपूर्ण घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर टाकू, अशी धमकी तिला दिली. लाहोरपासून 150 किमी अंतरावर फैसलाबादमध्ये 8 ऑगस्ट रोजी ही धक्कादायक घटना घडली. मंगळवारी या घटनेचा व्हिडिओ समोर आला, ज्यामध्ये आरोपी या मुलीला मारहाण करताना दिसतात. यासोबतच तिच्या डोक्याचे केस आणि भुवया कापून आरोपीचे बूट चाटण्यास तिला भाग पाडलं गेलं. ही तरुणी डेंटल सर्जरीच्या पाचव्या वर्षाची विद्यार्थिनी आहे. बायकोनं मध्यरात्री पतीच्या प्रायव्हेट पार्टवर टाकले उकळतं पाणी, जाणून घ्या संपूर्ण प्रकरण पोलिसांनी सांगितलं की मुख्य आरोपी शेख दानिश, त्याची मुलगी आणि इतर पाच संशयितांना अटक केली आहे. पंजाब पोलिसांनी सांगितलं की, 'दानिश आणि त्याच्या मुलीसह सात आरोपींना अटक करण्यात आली आहे. उर्वरितांच्या अटकेसाठी छापे टाकण्यात येत आहेत. पीडिता तिच्या वृद्ध आईसोबत राहत होती तर तिचे दोन भाऊ ब्रिटन आणि ऑस्ट्रेलियात राहतात.' पोलिसांनी विद्यार्थिनीचं अपहरण, छळ, खंडणी आणि लैंगिक अत्याचार प्रकरणी पाकिस्तान दंड संहितेच्या संबंधित कलमांखाली 15 जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. एफआयआरमध्ये पीडितेनं म्हटलं आहे की, ती आणि दानिशची मुलगी अन्ना मैत्रिणी आहेत आणि अन्नाच्या कुटुंबाशी तिचे जवळचे संबंध आहेत. ती म्हणाली, 'अन्नाचे वडील शेख दानिश यांनी मला लग्नाची ऑफर दिली पण मी आणि माझ्या कुटुंबीयांनी ती नाकारली. दानिश माझ्या वडिलांच्या वयाचा आहे आणि जेव्हा मी अन्नाला हे सांगितलं, तेव्हा ती माझ्यावर चिडली.' 20 वर्षीय पोटच्या मुलीवर बापाकडून बलात्कार, पीडितेने लावले गंभीर आरोप पीडितेनं सांगितलं की, 8 ऑगस्ट रोजी तिचा भाऊ ब्रिटनमधून परतल्यावर दानिश आणि त्याचे 14 साथीदार पीडितेच्या घरी आले आणि त्यांनी पीडितेच्या भावावरही लग्नाचा प्रस्ताव मान्य करण्यासाठी दबाव टाकला. मात्र, भावानेही हा प्रस्ताव मान्य न केल्याने आरोपींना या तरुणीला आणि तिच्या भावाला मारहाण करण्यास सुरुवात केली. यानंतर दोघांनाही जबरदस्ती आपल्या घरी नेलं. आरोपींनी या तरुणीला दानिशचे बूट चाटण्यास भाग पाडलं तसंच तिच्या भुवया आणि डोक्याचे केसही कापले. आरोपींनी याचा व्हिडिओही बनवला. पीडितेच्या म्हणण्यानुसार, आरोपींने त्यांचे मोबाईल हिसकावून घेतले आणि सोन्याचे दागिनेही घेतले. .
First published:

Tags: Crime news, Shocking news

पुढील बातम्या