• Home
 • »
 • News
 • »
 • crime
 • »
 • तीन मुली झाल्यानं नाराज बापानं उचललं टोकाचं पाऊल; पत्नीसह मुलींना ढकललं विहिरीत, मात्र...

तीन मुली झाल्यानं नाराज बापानं उचललं टोकाचं पाऊल; पत्नीसह मुलींना ढकललं विहिरीत, मात्र...

एकापाठोपाठ तीन मुली झाल्यानं या व्यक्तीनं आपल्या पत्नीसह दोन मुलींना विहिरीत ढकलून दिलं. यादरम्यान विहिरीत बुडून एका चिमुकलीचा मृत्यू झाला (Girl Drowned in Well) आहे.

 • Share this:
  भोपाळ 07 जून : आजही देशभरात अनेक ठिकाणी मुलीच्या जन्मानंतर घरात नाराजी पसरल्याचं दिसतं. ही अत्यंत चुकीची गोष्टी असली तरीही यातूनच अनेकदा गंभीर गुन्हे झाल्याचंही पाहायला मिळतं. अशीच आणखी एक घटना समोर आली असून यात बापानंच स्वतःच्या मुलीला जीवे मारलं असल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. एकापाठोपाठ तीन मुली झाल्यानं या व्यक्तीनं आपल्या पत्नीसह दोन मुलींना विहिरीत ढकलून दिलं. यादरम्यान विहिरीत बुडून एका चिमुकलीचा मृत्यू झाला (Girl Drowned in Well) आहे. ही घटना मध्यप्रदेशच्या (Madhya Pradesh) छतरपूर जिल्ह्यातील आहे. घटनेत या व्यक्तीच्या पत्नीचा जीव वाचला आहे, तर तिनं आपल्या 3 महिन्याच्या मुलीलाही वाचवलं आहे. चंदला ठाण्याच्या क्षेत्रात असलेल्या डढिया गावातील राजा भैया यादव आपली पत्नी बिट्टी आणि दोन मुलींना दुचाकीवरुन घेऊन चालला होता, इतक्यात पडोई गावाजवळ रस्त्यापासून थोडं दूर एक निर्मनुष्य जागा पाहून त्यानं आपली गाडी थांबवली. यानंतर त्यानं आपली पत्नी आणि दोन्ही मुलींना विहिरीत ढकलून दिलं. VIDEO: वांद्र्यात इमारतीचा काही भाग कोसळून एकाचा मृत्यू, 4 जण जखमी पाण्यात बुडून यातील एका मुलीचा मृत्यू झाला. मात्र, त्याच्या पत्नीनं आपल्या तीन महिन्याच्या मुलीला वाचवलं आणि ती विहिरीतून बाहेर आली. यानंतर रस्त्यावरुन जाणाऱ्या लोकांची मदत मागत ती पोलीस ठाण्यात पोहोचली आणि पतीविरोधात तक्रार दाखल केली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडितेच्या वडिलांचं असं म्हणणं आहे, की जावई त्यांच्या मुलीला याआधीही अनेकदा मारहाण करत असे. यानंतर आता त्यानं हे कृत्य केलं आहे. तिन्ही मुलीच झाल्यानं तिचा पती तिला सतत मारहाण करत होता. अनेकदा तो जीवे मारण्याची धमकीही देत असे. आरोपी राजा भैया विरोधात हत्या आणि हत्येचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस सध्या त्याचा शोध घेत आहेत.
  Published by:Kiran Pharate
  First published: