Home /News /crime /

30 फेक Insta अकाऊंट काढून तरुणीचं भलतंच कांड; एक्स बॉयफ्रेंडला अडकवण्यासाठी केली हद्द पार

30 फेक Insta अकाऊंट काढून तरुणीचं भलतंच कांड; एक्स बॉयफ्रेंडला अडकवण्यासाठी केली हद्द पार

Representative Image

Representative Image

कोर्टनीने आपल्या एक्स बॉयफ्रेंडला तुरुंगात पाठवण्यासाठी तब्बल 30 फेक इन्स्टा अकाऊंट बनवले आणि त्यावरुन स्वतःला चाकू मारून हत्या करण्याचे धमकीचे मेसेज पाठवले.

  नवी दिल्ली 14 जानेवारी : एका तरुणीने आपल्या एक्स बॉयफ्रेंडला त्रास देण्यासाठी अतिशय विचित्र पद्धत वापरली. तिने एक-दोन नाही तर 30 फेक इन्स्टाग्राम अकाऊंट (Fake Instagram Account) काढले आणि यावरुन स्वतःलाच धमकीचे मेसेज पाठवले. यानंतर तिने हा आरोप आपल्या एक्स बॉयफ्रेंडवर (Fake Allegations on Ex Boyfriend) लगावला, की तो तिला मारण्याचा प्रयत्न करत आहे. तिच्या या कृत्यामुळे तरुणाचं आयुष्य उद्धवस्त झालं. हे प्रकरण ब्रिटनच्या लिवरपूल येथील आहे. यात 20 वर्षीय कोर्टनी आयरलँड-एन्सवर्थ हिचं मागील वर्षीय 22 वर्षीय बॉयफ्रेंड लुईस जॉली याच्यासोबत भांडण झालं. वादानंतर कोर्टनीने जॉलीला सोडलं. मात्र, यानंतर कोर्टनीने जॉलीला अडकवण्यासाठी अतिशय वाईट शक्कल लढवली. यामुळे जॉलीचं आयुष्यच उद्धवस्त झालं. दिवसाढवळ्या तरुणीच्या डोळ्यात फेकली धूळ, पाठमोरी होताच पळवली स्कूटी, Video डेली मेलच्या रिपोर्टनुसार, कोर्टनीने आपल्या एक्स बॉयफ्रेंडला तुरुंगात पाठवण्यासाठी तब्बल 30 फेक इन्स्टा अकाऊंट बनवले आणि त्यावरुन स्वतःला चाकू मारून हत्या करण्याचे धमकीचे मेसेज पाठवले. इतकंच नाही तर तिने जॉलीवर पाठलाग करणं, अश्लील कमेंट करणं, छळ असे अनेक आरोप केले आणि पोलिसांत तक्रार दिली. यामुळे जॉलीला सहा वेळा अटक कऱण्यात आली. 81 तास तुरुंगात घालवावे लागले. यात रात्रभराची रिमांडही होती. यादरम्यान जॉलीला आपली नोकरीही गमवावी लागली. त्याला इलेक्ट्रॉनिक टॅगसोबत घरातच नजरबंद करण्यात आलं.

  त्या वस्तूमुळे फुटलं धोकेबाज पतीचं बिंग; पत्नीने विचित्र पद्धतीने घेतला बदला

  लुईस जॉलीने कोर्टनीचे आरोप मान्य केले नाहीत आणि तिच्याविरोधातच तक्रार दाखल केली. सुनावणीदरम्यान कोर्टाने या मेसेजचा तपास करण्याचा आदेश दिला. मात्र, मेसेज रिकव्हर होण्यात भरपूर वेळ गेला आणि केस सुरूच राहिली. मात्र, नुकतंच या प्रकरणात महत्त्वाचं वळण आलं. यात समजलं की हे इन्स्टा अकाऊंट कोर्टनीच्या मोबाईलहूनच बनवले गेले होते. या सगळ्या अकाऊंटचा आयपी अॅड्रेस सारखाच होता. नंतर समजलं की तरुणीने स्वतःच आपल्याला हे धमकीचे मेसेज पाठवले होते. चौकशीदरम्यान कोर्टनीने आपला गुन्हा मान्य केला. कोर्टनीच्या या कारनाम्यात तिचा नवा बॉयफ्रेंडही सहभागी होता. सध्या या प्रकरणात तरुणीला 10 महिने तुरुंगवासाची शिक्षा सुनावण्यात आली आहे. या संपूर्ण घटनेमुळे जॉलीच्या मानसिक आरोग्यावरही मोठा परिणाम झाला आहे.
  Published by:Kiran Pharate
  First published:

  Tags: Crime news, Shocking news

  पुढील बातम्या