'रुग्णालयात माझ्या आईसोबत छेडछाड झाली आणि...'; रडतरडत चिमुकलीची स्मृती इराणींकडे तक्रार

'रुग्णालयात माझ्या आईसोबत छेडछाड झाली आणि...'; रडतरडत चिमुकलीची स्मृती इराणींकडे तक्रार

कोरोना (Coronavirus) आणि ब्लॅक फंगस (Black Fungus) पीडित महिलेनं डॉक्टर आणि कर्मचाऱ्यांवर छेडछाड आणि मारहाणीसारखे (Harassment in Hospital) गंभीर आरोप केले आहेत.

  • Share this:

लखनऊ 13 जून : लखनऊच्या लोहिया संस्थानात कोरोना (Coronavirus) आणि ब्लॅक फंगस (Black Fungus) पीडित महिलेनं डॉक्टर आणि कर्मचाऱ्यांवर छेडछाड आणि मारहाणीसारखे (Harassment in Hospital) गंभीर आरोप केले आहेत. घाबरलेल्या या महिलेनं रुग्णालयातून आपली सुटका करुन घेतली आणि नंतर आपल्या कुटुंबीयांना ही संपूर्ण बाब सांगितली. पीडितेच्या मुलीनं अमेठी दौऱ्यावर असलेल्या खासदार आणि केंद्रीय मंत्री स्मृती ईराणी यांच्याकडे या प्रकरणाची तक्रार केली आहे. रडरडत ही मुलगी केंद्रीय मंत्र्यांना म्हणाली, की माझ्या आईसोबत छेडछाड झाली आहे. यानंतर स्मृती इराणींना याप्रकरणाच्या चौकशीचे आदेश दिले आहेत.

अमेठीतील एका 40 वर्षीय महिलेची प्रकृती सहा जून रोजी खराब झाली होती. यानंतर कुटुंबीयांनी महिलेला गौरीगंजमधील संयुक्त जिल्हा रुग्णालयात दाखल केले. तिची तब्येत ढासळल्यानंतर डॉक्टरांनी महिलेला लोहिया इन्स्टिट्यूटमध्ये घेऊन जाण्यास सांगितले. यानंतर कुटुंबीय रुग्णाला घेऊन याठिकाणी दाखल झाले. येथे डॉक्टरांनी तपासणी केली. तपासणीत महिलेला कोरोनाची लागण झाल्याचं समोर आलं. महिलेच्या चेहऱ्यावर आलेल्या सूजेचं कारण ब्लॅक फंगस असल्याचं डॉक्टरांनी सांगितले. प्रथमोपचारानंतर महिलेला शहीद पथ येथील माता चाइल्ड रेफरल (कोविड हॉस्पिटल) रुग्णालयाच्या चौथ्या मजल्यावर दाखल करण्यात आले. येथे बेड नंबर 85 वर महिलेवर उपचार सुरू झाले.

दुर्मिळ आजारानं ग्रासलेल्या अयांशला दिलं तब्बल 16 कोटींचं औषध

कोविड हॉस्पिटल असल्याने डॉक्टरांनी नातेवाईकांना रूग्णांसोबत रहाण्यापासून रोखले. बर्‍याच विनंत्यांनंतर जेव्हा त्यांना रुग्णाला भेटण्याची परवानगी दिली गेली तेव्हा महिलेची प्रकृती खालावत चालली होती. डॉक्टर आणि कर्मचार्‍यांनी तिला मारहाण केली, असं या महिलेने सांगितले. तिच्यावर अत्याचारही करण्यात आले. या घटनेने महिला भयभीत झाली होती. घाबरलेल्या कुटुंबातील सदस्यांनी शुक्रवारी डिस्चार्ज घेत महिलेला गौरीगंज येथील जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात केले.

कारागृहात कपडे धुवायला लावल्याचा घेतला बदला; पुरंदरमध्ये तरुणाचा निर्घृण खून

शनिवारी ऑक्सिजन प्लाटंच्या उद्घाटनासाठी आलेल्या केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांची पीडितेच्या कुटुंबीयांनी भेट घेतली. महिलेच्या मुलीनं रडरडत इराणी यांच्याकडे न्यायाची मागणी केली. यानंतर स्मृती इराणी यांनी कारवाईचे निर्देश दिले. लोहिया संस्थानाचे प्रवक्ता डॉ. श्रीकेश सिंह म्हणाले, की महिलेला गंभीर अवस्थेत रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. तिला कोणत्याही प्रकारची मारहाण झाल्याची किंवा अत्याचार झाल्याची तक्रार आलेली नाही. हे सर्व आरोप खोटे असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. अमेठीचे डीएम अरुण कुमार म्हणाले, की एसडीएम, सीओ आणि एसीएमओची टीम याप्रकरणी चौकशी करेल. या कमेटीच्या रिपोर्टनंतर योग्य ती कारवाई केली जाईल.

Published by: Kiran Pharate
First published: June 13, 2021, 1:02 PM IST

ताज्या बातम्या