Home /News /crime /

धक्कादायक! एका मेसेजमुळे मुलीने संपवलं आयुष्य; यात असं नेमकं काय लिहिलं होतं?

धक्कादायक! एका मेसेजमुळे मुलीने संपवलं आयुष्य; यात असं नेमकं काय लिहिलं होतं?

मेगन हिने धक्कादायक आणि भीतीदायक मेसेजेसला कंटाळून 5 वर्षापूर्वी आत्महत्या केली. मेगनची आई निकोला हिला त्यावेळी आपल्या मुलीच्या मानसिक त्रासाबद्दल काहीही माहिती नव्हतं.

    नवी दिल्ली 11 जानेवारी : 14 वर्षाची अतिशय सुंदर, हसमुख मुलगी मेगन इन्वास आता या जगात राहिली नाही. तिने स्वतःच आपलं आयुष्य संपवण्याचा निर्णय घेतला आणि गळफास घेत आत्महत्या केली (Girl Commit Suicide After Received Shocking Message). मेगनची आई आजही तो क्षण आठवून अतिशय दुःखी होते. ती नेहमी स्वतःला या गोष्टीसाठी दोष देते, की ती आपल्या मुलीची मदत का करू शकली नाही. हे मला का समजलं नाही, की माझ्या मुलीचं दुःखच तिच्या जीवावर उठलं आहे. Pune: आधी बलात्कार केला मग कर्कटकाने शरीरावर दिल्या 25जखमा; नराधम जेलमध्ये सडणार मेगन हिने धक्कादायक आणि भीतीदायक मेसेजेसला कंटाळून 5 वर्षापूर्वी आत्महत्या केली. मेगनची आई निकोला हिला त्यावेळी आपल्या मुलीच्या मानसिक त्रासाबद्दल काहीही माहिती नव्हतं. मात्र आता ती आपल्या कुटुंबासोबत मिळून लोकांना आपल्या मुलांवर लक्ष देण्याबाबत, त्यांना समजून घेण्याबाबत आणि जाणून घेण्याबाबत जागरूक करत आहे (Awareness About Mental Health). निकोलाने आता ‘मेगन स्टार फाउंडेशन’च्या माध्यमातून ही मोहिम सुरू केली आहे. एका ऑनलाईन मेसेजमुळे मेगनने गळफास घेत आत्महत्या केली. यावेळी तिने आपल्या कुटुंबीयाचा आणि स्वतःचा विचारही केला नाही. यावेळी तिच्या डोक्यात फक्त त्या व्यक्तीचा मेसेज होता. ज्यात लिहिलं होतं, की तू स्वतःला लटकवून का घेत नाही. याचा उत्तर देत तिने ‘OK’ लिहिलं आणि तेच केलं जे सायबर क्रिमिनल्सला पाहिजे होतं. तिने गळफास घेत आत्महत्या केली. इमारतीच्या चौथ्या मजल्यावर खेळत होती 6 वर्षांची चिमुरडी, तोल जाऊन मृत्यू मेगनला अनेक दिवसांपासून त्रासदायक आणि भीतीदायक मेसेज येत होते. या मेसेजमुळे ती हळूहळू डिप्रेशनमध्ये जावू लागली. तिने या मेसेजबद्दल आपल्या आईसोबत चर्चा केली असती, तर कदाचित यावर काहीतरी पर्याय सापडला असता आणि मेगनचा जीव वाचला असता. मेगनची आईही आपल्या मुलीच्या मृत्यूला आपली हार मानते. या महिलेनं म्हटलं की मला असं वाटायचं की मुलं डिप्रेशनमध्ये असतील तर दुःखी असतील आणि काळी कपडे घालून गाणी लावून आपल्या रूममध्ये बसतील. मात्र प्रत्यक्षात असं काहीच होत नाही असं मला माझ्या मुलीच्या मृत्यूनंतर समजलं. हे वेळेत न कळाल्याने मी माझ्या मुलीला गमावलं. याच वाईट अनुभवानंतर आता निकोला लोकांना आपल्या मुलांच्या मानसिक आरोग्याबाबत जागरूक करते.
    Published by:Kiran Pharate
    First published:

    Tags: Mental health, Shocking news, Suicide news

    पुढील बातम्या