भाचीची छेड काढल्याचा विरोध केल्यानं पत्रकारवर गोळीबार, हल्ल्याचा थरारक VIDEO समोर

भाचीची छेड काढल्याचा विरोध केल्यानं पत्रकारवर गोळीबार, हल्ल्याचा थरारक VIDEO समोर

मुलींच्या डोळ्यादेखत पत्रकार वडिलांवर गोळीबार, हल्ल्याचा थरारक CCTV VIDEO समोर

  • Share this:

गाझियाबाद, 22 जुलै: पत्रकार विक्रम जोशी (Journalist Vikram Joshi) यांचा बुधवारी पहाटे उपचारादरम्यान रुग्णालयात मृत्यू झाला. सोमवारी त्यांच्यावर काही अज्ञातांनी हल्ला केला. मुलींसोबत जात असताना काही अज्ञातांनी त्यांना घेरलं आणि बेदम मारहाण केली. मुलींच्या डोळ्यादेखतच त्यांच्यावर गोळीबार केला. यामध्ये पत्रकार विक्रम जोशी गंभीर जखमी झाले होते.

गाझियाबाद येथील यशोदा रुग्णालयात त्यांना उपचारासाठी दाखल करण्यात आलं. या प्रकरणी पोलिसांनी 9 सध्या जणांना अटक केल्याची माहिती मिळाली आहे. तर पोलीस चौकी इंचार्जला निलंबित करण्यात आलं आहे. पत्रकाराच्या भाजीसोबत झालेल्या छेडछाड प्रकरणी तक्रार केल्याच्या रागातून हा प्रकार घडल्याचा आरोप केला जात आहे.

विक्रम यांच्या भाचीने 16 जुलै रोजी काही तरुणांविरोधात पोलीस ठाण्यात छेड काढत असल्याची तक्रार दाखल केली होती. पोलिसात तक्रार दाखल केल्याच्या रागातून या अज्ञात तरुणांनी बदल्याच्या भावनेतून पत्रकार विक्रम यांना मारहाण करून गोळीबार केला.

हे वाचा-मोठ्या भावाने समोसा खाल्ला म्हणून 11 वर्षाच्या लहान भावाने केली आत्महत्या

ही संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. या व्हिडीओमध्ये आपण पाहू शकता काही तरुण मिळून पत्रकार विक्रम जोशी यांना बेदम मारहाण करत आहेत. मिळालेल्या माहितीनुसार सोमवारी विक्रम आणि त्यांच्या दोन मुली दुचाकीवरुन जात होत्या. त्यावेळी काही अज्ञात तरुणांनी त्यांना घेरलं आणि वाद घालण्यास सुरुवात केली. या तरुणांनी बेदम मारहाण करत त्यांना गोळी घातली आणि हल्लेखोर फरार झाले. या घटनेत कुटुंबाच्या वतीने 3 जणांविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हे वाचा-मुंबईत महिलेला तब्बल 11 लाखांना लुटले, पद्धत पाहून पोलीसही गेले चक्रावून!

भाचीसोबत झालेल्या प्रकरणानंतरही पोलिसांनी केवळ एफआयआऱ दाखल केला मात्र कारवाई न केल्यानं हा प्रसंग घडल्याचा आरोप पत्रकार विक्रम जोशी यांच्या नातेवाईकांनी केला आहे.

Published by: Kranti Kanetkar
First published: July 22, 2020, 8:23 AM IST

ताज्या बातम्या