मुंबई,23 जानेवारी : NCB म्हणजेच केंद्रीय अंमली पदार्थ विरोधी पथकाची सुत्रे समीर वानखेडे (Sameer Wankhede) यांनी हाती घेतली आणि अनेक ड्रग्स (Drugs) तस्करांचे कंबरडे मोडले. असाच एक राजाभोज आहे ज्याची हालत 'गंगू तेली' पेक्षाही वाईट झाली आहे. कारण त्याने NCB च्या समीर वानखेडेंशी पंगा घेतला होता.
सोन्याचे सिंहासन, सोन्याचा मोबाईल आणि सोन्याचे लायटर, एवढंच नाही तर जवळपास अंगावर 5 किलो सोनं. एवढंच काय तर रात्री झोपताना पण हा महाभाग सोनं घालून झोपतो. एकवेळ अंगावर कपडे घालणार नाही पण सोनं घालेन असं फोटोतील ही व्यक्ती सर्वांना सांगायचा. याला सोनं घालून मिरवायची खूप आवड आहे. याचे राहणीमान एका श्रीमंतालाही लाजवेल असे आहे. सतत सोन्यात आणि पैशांत लोळणारी फोटोत दिसणारी ही व्यक्ती आहे परवेज पठाण उर्फ चिंकू पठाण. पण हा चिंकू पठाण NCB चे चीफ समीर वानखेडे यांच्या रडारवर आला आणि या गोल्डन किंगचा म्हणजेच राजाभोजचा पार गंगू तेली झाला. कारण, हे ऐश्वर्य याने अंमली पदार्थांची तस्करी करुन मिळवले होते.
भीषण! आईनेच केला पोटच्या मुलावर लैंगिक अत्याचार; न्यायाधीशही हादरले!
गेली 5 रात्र चिंकू पठाण NCB च्या लाॅकअपमध्ये फर्शीवर झोपून काढतोय. सोन्याच्या ताटात पंच पकवान जेवणारा चिंकू मिळेल ते जेवण येईल त्या ताटातून खातोय. ज्या अंमली पदार्थांच्या जीवावर चिंकूने ऐश्वर्य कमावले त्याच अंमली पदार्थांच्या तस्करीमुळे चिंकूची ही परिस्थिती झाली आहे.
अंडरवर्ल्ड डाॅन आणि तस्करीच्या दुनियेतील कुख्यात करीमलाला पठाणचा चिंकू पठाण हा नातू आहे. मला गोल्डन डाॅन बोलायचे असं हा याच्या पंटरना सांगायचा. NCB ने याला नवी मुंबईतील घणसोली येथून अटक केली. याच्याकडून कोट्यवधी रुपयांचे अंमली पदार्थ जप्त केले आहे.
अकोल्यात उच्चभ्रू परिसरात मसाजच्या नावाखाली वेश्या व्यवसाय, डॉक्टराला अटक
चिंकूला मुंबई पोलिसांनी विविध गुन्ह्याखाली तडीपार केले आहे. पण तरीही तो आपले कनेक्शन वापरुन डोंगरीत येत होता. शेवटी त्याचा मुक्काम आता जेलमध्ये झालाय कारण त्याने अंमली पदार्थ तस्करी करुन थेट NCB च्या समीर वानखेडेंशी पंगा घेतला होता. दाऊदचे मुंबईतील ड्रग्सचे नेटवर्क संपवण्याचा विडाच जणू एनसीबीने उचलला. एकमागोमाग एक कारवाई करत एनसीबीने डी कंपनीला धक्के द्यायला सुरुवात केली आहे. एवढंच नाही तर चिंकू पठाण सारख्या दाऊदच्या मोठ्या हस्तकांच्या मुसक्या एनसीबीने आवळल्याने डी कंपनीचं कंबरडंच मोडले आहे.