Home /News /crime /

कुख्यात डॉन अरुण गवळी पुन्हा 28 दिवसांसाठी जेलबाहेर

कुख्यात डॉन अरुण गवळी पुन्हा 28 दिवसांसाठी जेलबाहेर

विशेष म्हणजे, लॉकडाउनच्या काळात अरुण गवळीला सलग दोन वेळा त्याला मुदतवाढ देण्यात आली होती.

नागपूर, 08 जुलै : कुख्यात डॉन अरुण गवळी पुन्हा एकदा जेलबाहेर येणार आहे.  नागपूर मध्यवर्ती कारागृहात परतलेला अरुण गवळीला मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने  28 दिवसाची संचित रजा मंजूर केली. न्यायमूर्ती झेड. ए. हक व नितीन सूर्यवंशी यांनी हा निर्णय दिला. अरुण गवळीने कारागृह प्रशासनाकडे 30 नोव्हेंबर 2019 रोजी सादर केलेला संचित रजेचा अर्ज फेटाळण्यात आला होता. त्यामुळे गवळीने उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. गवळीला रजेवर सोडल्यास कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होईल, असे सरकारचे म्हणणे होते. गवळीचे वकील अली यांनी हे कारण निरर्थक ठरवले. गवळीला यापूर्वीही अनेकदा रजेवर सोडले. ही चिपळ्या वाजवायची वेळ आहे का? सेनेचा फडणवीसांना सणसणीत टोला दरम्यान, त्याने कोणताही गुन्हा केला नाही. कायद्याचे पालन केले असे अॅड. अली यांनी सांगितले. ही बाब लक्षात घेता गवळीला दिलासा देण्यात आला. विशेष म्हणजे, लॉकडाउनच्या काळात अरुण गवळीला सलग दोन वेळा त्याला मुदतवाढ देण्यात आली होती. चौथ्या पॅरोलसाठीही त्याने उच्च न्यायालयात धाव घेतली होती.  उच्च न्यायालय पॅरोल मुदतवाढ देईल असा विश्वास अरुण गवळीला होता. पण शेवट न्यायालयाने त्याला पॅरोल देण्यास नकार दिला. कोर्टाने याबद्दल आता कोणतीही याचिका स्वीकारणार नाही, अशी भूमिका घेतली होती. त्यानंतर मे महिन्यात अरुण गवळी पुन्हा कारागृहात हजर झाला होता. आनंदाची बातमी! कोरोनाच्या संकटात 'या' बँकेच्या कर्मचाऱ्यांची होणार पगारवाढ लाकडाउनच्या काळात काळात अरुण गवळीच्या मुलीचा लग्न सोहळा ही पार पडला होता. या सोहळ्याला अरुण गवळी हजर होता.
Published by:sachin Salve
First published:

Tags: जेल, नागपूर

पुढील बातम्या