जन्मठेपेच्या शिक्षेविरोधात गँगस्टर अरुण गवळी सुप्रीम कोर्टात, शिवसेना नगरसेवकाच्या हत्येचं प्रकरण

जन्मठेपेच्या शिक्षेविरोधात गँगस्टर अरुण गवळी सुप्रीम कोर्टात, शिवसेना नगरसेवकाच्या हत्येचं प्रकरण

शिवसेनेचे तत्कालीन नगरसेवक कमलाकर जामसांडेकर यांची गवळींच्या माणसांनी 2 मार्च 2007 ला हत्याकेली होती.

  • Share this:

प्रशांत लीला रामदास, नवी दिल्ली 28 जानेवारी : शिवसेना नगरसेवकाच्या हत्येप्रकरणी गँगस्टर अरुण गवळी सध्या जन्मठेपेची शिक्षा भोगत आहे. त्या विरोधात आता त्याने सुप्रीम कोर्टात याचिका दाखल केलीय. सुप्रीम कोर्टात न्यायाधीश आर. भानुमती आणि ए. एस. बोपण्णा यांच्या खंडपीठापुढे याप्रकरणी सुनावणी सुरु असून कोर्टाने राज्य सरकारला नोटीस बजावली आहे. गवळीला दिलेले जन्मठेपेची शिक्षा मुंबई उच्च न्यायालयाने कायम ठेवली होती. अरुण गवळी सध्या शिवसेनेचे नगरसेवक कमलाकर जामसंडेकर यांच्या खूनप्रकरणी नागपूर मध्यवर्ती कारागृहात जन्मठेपेची शिक्षा भोगत आहे.

शिवसेनेचे नगरसेवक कमलाकर जामसांडेकर खून प्रकरणात कोर्टाने दोषी ठरवलं आहे. या खटल्यातील 15 आरोपींपैकी अरुण गवळीसह 12 जणांना विशेष मोक्का कोर्टाने दोषी ठरवलं आहे. तर 3 जणांची पुराव्याअभावी निर्दोष सुटका करण्यात आली होती.

बहिणीच्या छेडछाडीला विरोध केल्याने भावाची हत्या

काय आहे प्रकरण?

मुंबईतल्या घाटकोपर असल्फा इथले शिवसेनेचे नगरसेवक कमलाकर जामसांडेकर यांची 2 मार्च 2007 ला हत्या करण्यात आली होती. जामसांडेकर हे आपल्या घरात बसलेले असताना दोन अज्ञात मारेकर्‍यांनी त्यांच्या घरात घुसून त्यांच्या डोक्यात गोळ्या घातल्या होत्या. शिवसेनेचे नगरसेवक जामसांडेकर यांच्या हत्येची सुपारी राष्ट्रवादीचे पदाधिकारी साहेबराव भिंताडे यांनी दिल्याचं सिद्ध झालं होतं.

साहेबराव हे शिवसेनेत उपशाखा प्रमुख असताना जामसांडेकर हे त्यांचे सहकारी होते.

लग्नाच्या निमंत्रणासाठी या तरुणांनी लढवली अशी भन्नाट आयडिया

जामसांडेकर हे प्रथम अपक्ष निवडून आलेत. त्यानंतर त्यांनी भिंताडे यांचा तीन वेळा पराभव केला.त्यामुळे चिडून साहेबराव भिंताडे याने तीस लाखाची सुपारी देऊन जामसांडेकर यांचा गवळी मार्फत काटा काढला. साहेबराव भिंताडेने जामसांडेकरांची सुपारी गवळीचे सहकारी प्रताप गोडसे आणि अजित राणे यांना दिली होती. अरुण गवळीने जामसांडेकर यांना मारण्याची जबाबदारी प्रताप गोडसेवर सोपवली होती. प्रताप गोडसेने हे काम विजय गिरीवर सोपवलं. विजय गिरीने नगरसेवक जामसांडेकर यांच्यावर गोळी झाडली.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jan 28, 2020 11:46 AM IST

ताज्या बातम्या