फेसबुकवरील नात्यावर ठेवला विश्वास, तरुणीला जंगलात बोलवत 25 जणांनी केला बलात्कार

फेसबुकवरील नात्यावर ठेवला विश्वास, तरुणीला जंगलात बोलवत 25 जणांनी केला बलात्कार

फेसबुकवरील मैत्रीतून (Facebook Friendship) अनेक गंभीर गुन्हे (Crime) घडल्याच्या घटना सतत समोर येत असतात. अशीच आणखी एक संतापजनक घटना घडली असून यात 25 जणांनी तरुणीवर सामूहिक बलात्कार (Gangrape) केला आहे.

  • Share this:

चंदीगड 14 मे : फेसबुकवरील मैत्रीतून (Facebook Friendship) अनेक गंभीर गुन्हे (Crime) घडल्याच्या घटना सतत समोर येत असतात. सोशल मीडियावर (Social Media) मैत्री आणि त्यातून पुढे समोरच्याचा विश्वास जिंकत कधी आर्थिक फसवणूक तर कधी बलात्कार अशा अनेक तक्रारी येत असतात. अशीच आणखी एक घटना समोर आली आहे. या भयंकर घटनेत 25 जणांनी मिळून तरुणीवर सामूहिक बलात्कार (Gangrape) केला आहे. हे प्रकरण तीन मे रोजीचं असून मुलीनं या घटनेची तक्रार केल्यानंतर पोलिसांनी केस दाखल करुन घेत कारवाई सुरू केली आहे.

हे प्रकरण हरियाणाच्या पलवल जिल्ह्यातील हसनपूर ठाण्याच्या क्षेत्रातील आहे. तरुणीनं आपल्या तक्रारीत म्हटलं आहे, की काही दिवसांपूर्वी तिची मैत्री रामगढचा रहिवासी असलेल्या सागर नावाच्या व्यक्तीसोबत झाली. तीन मे रोजी सागरनं या तरुणीला लग्नासाठी आपल्या कुटुंबीयांना भेटण्यासाठी होडल येथे बोलावलं. जेव्हा तरुणी तिथे पोहोचली तेव्हा सागर तिला आपल्या घरी घेऊन जाण्याऐवजी रामगढ गावाजवळील एका जंगलात घेऊन गेला. इथे 25 जणांनी तिच्यासोबत सामूहिक बलात्कार केला.

तक्रारीत म्हटल्यानुसार, तरुणीची प्रकृती खराब होत असल्याचं दिसताच सागर आणि त्याच्या तीन मित्रांनी तिला गाडीमध्ये घेऊन जात दिल्लीच्या बदरपूर बॉर्डरवर बेशुद्ध अवस्थेतच फेकून दिलं. तरुणीच्या म्हणण्यानुसार, त्यानंतर अनेक दिवस तिला उठता येत नव्हतं. जेव्हा तिला चालता येणं शक्य झालं, तेव्हा तिनं 12 मे रोजी या घटनेबाबत हसनपुर ठाण्यात तक्रार दाखल केली.

तरुणीच्या तक्रारीनुसार, पोलिसांनी 12 मे रोजी सागरसह इतर 24 जणांविरोधात अपहरण आणि सामूहिक बलात्कारासाठी विविध कलमांच्या आधारे केस दाखल करुन घेत कारवाई सुरू केली आहे. मात्र, अद्याप कोणत्याही आरोपीला अटक करण्यात आलेली नाही.

Published by: Kiran Pharate
First published: May 14, 2021, 10:50 AM IST
Tags:

ताज्या बातम्या