Home /News /crime /

मित्राने साखरपुड्याला बोलावले अन् दारू पाजून केला सामूहिक बलात्कार, मुंबईतील घटना

मित्राने साखरपुड्याला बोलावले अन् दारू पाजून केला सामूहिक बलात्कार, मुंबईतील घटना

धक्कादायक म्हणजे, या पार्टीला आणखी दोन महिला उपस्थितीत होत्या. या महिला निघून गेल्यानंतर तिघांनी आपल्याच मैत्रिणीवर अत्याचार केले.

    मुंबई, 17 नोव्हेंबर : मुंबईतील (Mumbai) एका हॉटेलमध्ये 22 वर्षीय तरुणीवर सामूहिक बलात्कार (Gang Rape) झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. एंगेजमेंट पार्टीला (Engagement party) बोलावून तीन मित्रांनी दारू पाजून तरुणीवर सामूहिक बलात्कार केला. या प्रकरणी गुन्हा दाखल केला असून आरोपी फरार आहे. दैनिक दिव्य मराठीने दिलेल्या वृत्तानुसार, ही घटना 8 नोव्हेंबर रोजी घडली होती. पण, आता या प्रकरणी पीडितेनं तक्रार दाखल केल्यानंतर सर्व प्रकार समोर आला आहे. धक्कादायक म्हणजे, तिन्ही मित्र हे तिचे चांगले मित्र आहे. मुंबईतील अंधेरी-कुर्ला रोडवरील एका हॉटेलमध्ये आरोपी अविनाश पेंगेकर याचा साखरपुडा आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाला अविनाशने पीडित तरुणीला बोलावले होते. शहीद वडिलांना 10 वर्षांच्या लेकीनं केला अखेरचा सलाम, दिला 'वंदे मातरम्'चा नारा साखरपुडा सोहळा संपल्यानंतर पाहुणे आपल्या घरी निघून गेले होते. त्यानंतर अविनाश पेंगेकर,  शिशिर(वय 27) आणि तेजस(वय 25) यांनी पीडित तरुणीला पार्टी करण्यासाठी थांबवले होते. काही वेळांनी या तिघांनी पीडितेला बळजबरीने दारू पाजली, दारूच्या नशेत असताना तिघांनी आळीपाळीने तिच्यावर अत्याचार केला. धक्कादायक म्हणजे, या पार्टीला आणखी दोन महिला उपस्थितीत होत्या. या महिला निघून गेल्यानंतर तिघांनी आपल्याच मैत्रिणीवर अत्याचार केले. बाळासाहेबांच्या स्मृतीदिनी मनसे नेत्याने शिवसेनेला डिवचलं, म्हणाले... 8 नोव्हेंबर रोजी ही घटना घडली होती. आपली आणि कुटुंबांची बदनामी होईल, या भीतीपोटी पीडित तक्रार करण्यास पुढे आली नाही. पण, ज्या मित्रांवर विश्वास ठेवला त्यांच्याकडून आपल्यावर झालेल्या अत्याचारामुळे असह्य झालेल्या तरुणीने अखेर पोलीस स्टेशन गाठले. पीडित तरुणीच्या फिर्यादीवरून आरोपींविरोधात भा. दं. वि. कलम 376 आणि 34 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घटनेपासून तिन्ही आरोपी फरार आहे. पोलीस फरार आरोपींचा शोध घेत आहे.
    Published by:sachin Salve
    First published:

    पुढील बातम्या