मराठी बातम्या /बातम्या /क्राईम /दीड महिन्यांपर्यंत पत्नीवर Gang Rape; प्रायव्हेट पार्टला सिगारेटचे चटके, अखेर...

दीड महिन्यांपर्यंत पत्नीवर Gang Rape; प्रायव्हेट पार्टला सिगारेटचे चटके, अखेर...

पत्नीला निर्वस्त्र करून मित्रांसमोर आणत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

पत्नीला निर्वस्त्र करून मित्रांसमोर आणत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

पत्नीला निर्वस्त्र करून मित्रांसमोर आणत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

भोपाळ, 16 जानेवारी : मध्य प्रदेशातील (Madhya Pradesh News) इंदूरमध्ये मेट्रोमोनियल वेबसाइटचे साइड इफेक्टस आणि पतीचा घृणास्पद चेहरा समोर आला आहे. पती पत्नीला निर्वस्त्र करून मित्रांसमोर आणत होता, आणि मित्रांसोबत मिळून पत्नीवर सामूहिक बलात्कार (Gang Rape) करीत होता. इतकच नाही तर अनेकदा पत्नीवर बलात्कार होताना हा समोर बसून बघत होता.

5 जणांना अनेकदा महिलेवर बलात्कार केले. पत्नी कशीबशी त्याच्या तावडीतून सुटली आणि पोलिसांकडे पोहोचली. तिने पतीसह त्याच्या मित्रांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, प्रॉपर्टी व्यावसायिक राकेश विश्वकर्मा यांनी मेट्रोमोनियल वेबसाइटच्या माध्यमातून छत्तीसगडमध्ये राहणाऱ्या शिक्षिकेसोहत मैत्री केली होती. तरुणीला प्रेमाच्या जाळ्यात अडकवून आरोपीने 24 ऑक्टोबर रोजी महिलेसोबत लग्न केलं आणि तिच्यासोबत इंदूरमधील फार्म हाऊसवर राहू लागला. काही दिवस तो चांगला पती असल्याचं दाखवित राहिला. मात्र हळूहळू त्याच्या वागणुकीत बदल होऊ लागला.

हे ही वाचा-20 वर्षीय तरुणीवर कारमध्ये रेप, निर्जनस्थळी नेऊन शेजाऱ्यानेच दिल्या नरक यातना

महिलेच्या शरीरावर दिले सिगारेटचे चटके...

लग्नाच्या काही दिवसांनंतर बिल्डर राजेश पत्नीवर अत्याचार करीत होता. तो इतका क्रूर आणि रानटी होता की आपल्या मित्रांसोबत पार्टी करताना पत्नीला दारूचे पेग बनवायला सांगत होता. अनेकदा पत्नीला निर्वस्त्र करून मित्रांसमोर आणत होता. अनेकदा आरोपीने महिलेच्या शरीरावर जळत्या सिगारेटचे चटके दिले. प्रायव्हेट पार्टवरही जळत्या सिगारेटचे चटके दिल्याचा आरोप महिलेने केला आहे. शरीरभर चावे घेतले. याशिवाय फार्म हाऊसमध्ये पती तिला मारहाण करीत होता. तब्बल दीड महिने महिलेने हा अत्याचार सहन केला आहे. आपल्या मित्रांसह शरीर संबंध ठेवण्याची जबरदस्तीही करीत होता. आरोपीचे मित्र अंकेश बघेल, विवेक विश्वकर्मा आणि विपीन भदौरिया यांनी अनेकदा महिलेवर बलात्कार केले. यानंतर आरोपी धारदार चाकून पत्नीला मारण्याची धमकी देत होता.

तरुणीला मारण्यासाठी पाठवले गुंड...

एकेदिवशी पीडिता त्याच्या घरातून पळून छत्तीसगडमधील आपल्या माहेरी गेली. यानंतर आरोपीने मित्र विपीन भदौरियाला पत्नीला मारण्यासाठी छत्तीसगडला पाठवलं. यानंतर पीडितेने सर्व प्रकार पोलिसांना सांगितला. या प्रकरणात आरोपीसह दोघांना अटक करण्यात आली असून अन्य आरोपींचा शोध सुरू आहे.

First published:

Tags: Crime news, Gang Rape, Madhya pradesh