Home /News /crime /

जीवे मारण्याची धमकी देत सामूहिक बलात्कार, सात महिन्यांनी पीडितेनं सांगितली घटना

जीवे मारण्याची धमकी देत सामूहिक बलात्कार, सात महिन्यांनी पीडितेनं सांगितली घटना

ठाणे ग्रामीणामधये 13 वर्षीय मुलीवर सामूहिक बलात्कार (Gang Rape) केल्याप्रकरणी पोलिसांनी चार अल्पवयीन मुलांवर गुन्हा दाखल केला आहे. ही घटना मागील वर्षी जुलै महिन्यात घडली होती. मात्र, पीडितेनं रविवारी याबद्दल माहिती दिली आहे.

    मुंबई 16 फेब्रुवारी : ठाणे ग्रामीणामधये 13 वर्षीय मुलीवर सामूहिक बलात्कार (Gang Rape) केल्याप्रकरणी पोलिसांनी चार अल्पवयीन मुलांवर गुन्हा दाखल केला आहे. या घटनेबद्दल तिनं कोणालाही सांगितलं, तर तिच्या पालकांना ठार मारण्याची धमकीही आरोपींनी दिली होती. या प्रकरणातील चारही आरोपी अल्पवयीन (Minor) असल्याचं गणेशपुरी पोलिसांनी सांगितलं. ही घटना गेल्या वर्षी जुलैमध्ये घडली होती. मात्र, पीडितेनं रविवारी म्हणजेच 14 फेब्रुवारीला घरच्यांना हा संपूर्ण प्रकार सांगितला.  यानंतर पीडितेच्या वडिलांनी  एका सामाजिक कार्यकर्त्याला संपर्क साधला आणि त्यानंतर चौघांविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. ही घटना मागील वर्षी जुलैमध्ये घडली होती. पीडित मुलगी दुकानामधून किरकोळ सामान खरेदी करून घरी जात असताना हा प्रकार घडला होता. आरोपींपैकी एकानं गावाजवळील एका जुन्या बंगल्यात जाण्यास सांगितलं आणि यानंतर त्या मुलासह इतर तिघांनी तिच्यावर बलात्कार केला. ही गोष्ट कोणालाही सांगितल्यास आम्ही तुझ्या वडिलांना जीवे मारू, अशी धमकी आरोपींनी तिला दिली होती. यानंतर काही दिवसांनी दोन आरोपींनी तिला पुन्हा बंगल्यात घेऊन जात तिच्यावर बलात्कार केला. एका पोलिस अधिकाऱ्यानं सांगितलं की, रविवारी मुलीच्या वडिलांनी एका आरोपीला आपल्या मुलीकडे पाहून अश्लील वर्तन करताना पाहिलं आणि यानंतर दोघांमध्ये भांडण झालं. या घटनेनंतर मुलीच्या वडिलांनी एका सामाजिक संस्थेकडे संपर्क साधला. यानंतर मुलीला विश्वासात घेतल्यानंतर तिनं या सर्व घटनेबद्दलची माहिती दिली.  यानंतर संबंधीत संस्थेनं पीडितेला पोलीस ठाण्यात घेऊन जात चारही आरोपींवर  लैंगिक अत्याचार प्रतिबंधक (Pocso) कायद्यान्वये गुन्हा दाखल केला.
    Published by:Kiran Pharate
    First published:

    Tags: Gang Rape, Rape accussed, Rape case

    पुढील बातम्या