लखनऊ 25 जुलै : भावाच्या डोक्यावर बंदुक ठेवत एका अल्पवयीन मुलीवर चार युवकांनी बलात्कार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. यादरम्यान आरोपींनी घटनेचा व्हिडिओदेखील (Video) बनवला. पीडितेनं घटनेबद्दल तक्रार केल्यास हा व्हिडिओ व्हायरल (Viral) करण्याची धमकी आरोपींनी दिली. उत्तर प्रदेशच्या (Uttar Pradesh) मुजफ्फरनगर येथे ही घटना घडली आहे.
राज कुंद्रा येणार गोत्यात, कर्मचारीच करणार पदार्फाश
तक्रार मिळताच पोलिसांनी (Police) याप्रकरणी गुन्हा दाखल करून घेत पीडितेला मेडिकल तपासणीसाठी पाठवलं आणि तपास सुरू केला आहे. हे प्रकरण फुगाना ठाण्याच्या क्षेत्रातील एका गावात शुक्रवारी रात्री उशिरा घडलं. घटनेत 12 वर्षाच्या भावाला शेजारच्याच चार युवकांनी बंदुकीचा धाक दाखवला. यानंतर त्याच्या 15 वर्षाच्या अल्पवयीन बहिणीवर सामूहिक बलात्कार केला.
दलित बापलेकासोबत जमावाचं अमानुष कृत्य; बेदम मारहाण करत हात-पाय मोडले अन्...
आरोपींनी अल्पवयीन मुलीसोबत सामूहिक बलात्कार करत याचा व्हिडिओदेखील आपल्या मोबाईलमध्ये कैद केला. तसंच याबद्दल कोणाला सांगितल्यास व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी दिली. आरोपींनी जेव्हा अल्पवयीन मुलीवर बलात्कार केला तेव्हा तिचे आई-वडील नातेवाईकांच्या घरी गेले होते. कुटुंबीय घरी येताच मुलीनं संपूर्ण घटनेची माहिती त्यांनी दिली. यानंतर कुटुंबीयांनी पोलिसांत याबाबत तक्रार दाखल केली. सध्या पोलिसांनी मुलीला मेडीकल तपासणीसाठी पाठवलं असून या संपूर्ण प्रकरणाचा तपास पोलीस करत आहेत.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Crime news, Rape case