Home /News /crime /

संतापजनक! 5 वर्षीय चिमुकलीवर सामूहिक बलात्कार, आरोपींचं वय ऐकून बसेल धक्का

संतापजनक! 5 वर्षीय चिमुकलीवर सामूहिक बलात्कार, आरोपींचं वय ऐकून बसेल धक्का

पाच वर्षीय चिमुकलीवर सामूहिक बलात्कार (Gang Rape on Minor Girl ) झाला आहे. या प्रकरणातील आणखी एक धक्कादायक बाब म्हणजे हा बलात्कार दोन अल्पवयीन मुलांनी केला आहे

    पाटणा 10 एप्रिल : बिहारच्या सिवानमधून एक संतापजनक घटना समोर आली आहे. याठिकाणी एका पाच वर्षीय चिमुकलीवर सामूहिक बलात्कार (Gang Rape on Minor Girl ) झाला आहे. या प्रकरणातील आणखी एक धक्कादायक बाब म्हणजे हा बलात्कार दोन अल्पवयीन मुलांनी केला आहे. यातील एकाचं वय 10 तर एकाचं वय 11 वर्ष आहे. या घटनेनंतर परिसरात एकच खळबळ उडाली आहे. टाइम्स नाउनं दिलेल्या वृत्तानुसार, अकरा वर्षीय आरोपी सिवानचाच रहिवासी आहे, तर दहा वर्षाचा दुसरा आरोपी उत्तर प्रदेशातील रहिवासी आहे. तो आपल्या मामाकडे राहाण्यासाठी आला होता. पीडित चिमुकलीच्या वडीलांनी पोलीस ठाण्यात एफआयआर दाखल केल्यानंतर अकरा वर्षाच्या आरोपीला त्याच्या घरच्यांनी दुसऱ्या शहरात शिफ्ट केलं. तर दुसऱ्या दहा वर्षीय आरोपीला त्याच्या नातेवाईकांनी उत्तर प्रदेशातील त्याच्या घरी पाठवलं. दीरावर प्रेम जडल्यानंतर पतीचा काढला काटा, कोरोनामुळे मृत्यू झाल्याचा केला बनाव या घटनेनंतर आरोपींचे सर्व पुरुष नातेवाईकही फरार झाले होते. अशात पोलिसांनी आरोपींच्या महिला नातेवाईकांना त्यांना हजर करण्यास सांगितलं होतं. पोलिसांनी कुटुंबीयांना कडक शब्दात इशाराही दिला. यानंतर बुधवारी अकरा वर्षीय आरोपीला त्याच्या कुटुंबीयांनी पोलिसांसमोर हजर केलं. यानंतर त्याचं मेडिकल केलं गेलं आणि त्याला न्यायालयात हजर करण्यात आलं. पोलिसांनी चिमुकलीचे रक्तानं माखलेले कपडेही फॉरेन्सिक तपासासाठी पाठवले आहेत. हाय प्रोफाइल मुलींना फसवत मेकॅनिकल इंजिनिअर बनला SEX रॅकेटचा सूत्रधार पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितलं, की आम्ही दुसऱ्या आरोपीच्या नातेवाईकांनाही त्याला पोलिसांसमोर हजर करण्यास सांगितलं आहे. न्यायालयाच्या निर्देशानुसार आरोपींविरोधात कारवाई केली जाईल, अशी माहितीही पोलिसांनी दिली.
    Published by:Kiran Pharate
    First published:

    Tags: Bihar, Crime, Gang Rape, Rape news

    पुढील बातम्या