मराठी बातम्या /बातम्या /क्राईम /

बंदुकीचा धाक दाखवून अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार, तिघांना पोलिसांनी पकडलं

बंदुकीचा धाक दाखवून अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार, तिघांना पोलिसांनी पकडलं

15 जून रोजी घरातील सर्व लोक एका नातेवाईकाच्या मुलाच्या लग्नासाठी गेले होते. त्यावेळी घरी मुलीशिवाय कोणीही नव्हते, वडील रोडवेज बस चालक असल्याने ते बाहेर गावी होते. घटनेच्या वेळी मुलगी घरी एकटीच झोपली होती.

  • Published by:  News18 Desk

लखनऊ, 20 जून: अल्पवयीन मुलगी एकटी असल्याचा गैरफायदा घेत तिला बंदुकीचा धाक दाखवत तिच्यावर सामूहिक बलात्कार (gang rape) केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. हे जातीय प्रकरण असल्याचे सांगितले जात असून इतर समाजातील 5 जणांनी मुलीवर सामूहिक बलात्कार (gang rape) केला आहे. मुलीच्या कुटुंबीयांनी पाचही जणांविरोधात पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाचे गांभीर्य पाहून एएसपी, सीओ घटनास्थळी पोहोचले आणि त्यांनी घटनेचा तपास सुरू केला.

सामूहिक बलात्काराच्या घटनेत सामील झालेल्या पाच आरोपींपैकी तिघांना आत्तापर्यंत अटक करण्यात आली असून इतरांचा शोध सुरू आहे. पोलिसांनी दोषींवर कडक कारवाई करणार असल्याचे सांगितले आहे. ही घटना उत्तर प्रदेशच्या हरदोईच्या सांडी परिसरातील खेड्यातील आहे. पीडित मुलीच्या भावाने पोलिसांना सांगितले की, 15 जून रोजी घरातील सर्व लोक एका नातेवाईकाच्या मुलाच्या लग्नासाठी गेले होते. त्यावेळी घरी मुलीशिवाय कोणीही नव्हते, वडील रोडवेज बस चालक असल्याने ते बाहेर गावी होते. घटनेच्या वेळी त्याची बहीण घरी एकटीच झोपली होती.

त्यानंतर गावातील पाच मुलं जबरदस्तीनं घरात शिरली आणि बंदुकीचा धाक दाखवून बहिणीला घेऊन गेले. यानंतर तिला शेतात नेऊन पाच जणांनी तिच्यावर सामूहिक बलात्कार केला. घरातील सर्वजण लग्नाच्या कार्यक्रमातून परत आल्यानंतर पीडित मुलीनं घडलेल्या घटनेची माहिती दिली.

हे वाचा - VIDEO: नवऱ्यासाठी नाही या गोष्टीसाठी तरुणीनं केलं लग्न? मंडपातील प्रकार पाहून वरातीही चक्रावले

पीडितेच्या भावाने पोलिसांना सांगितले की, संबंधित तरुणांनी हे कृत्य केल्यानंतर मुलीला याबाबत कोणाला सांगितल्यास तिच्यासह कुटुंबातील सर्वांना जीवे मारण्याची धमकी दिली. त्यामुळं मुलगी घाबरून गेली होती. संबंधित तरुण गुंड वृत्तीचे असून या परिसरात दहशत माजवण्याचा प्रयत्न करत आहेत. पोलिसांकडे तक्रार केल्यास सर्वांना गोळ्या घालण्याची धमकी दिली जात असल्याचे त्याने सांगितले.

हे वाचा - पूजा, शीतल…महिलांच्या नावानं फेसबुकवरून बनवल्या 2000 फ्रेंड, मग करू लागला असं काम

याबाबत पोलीस अधीक्षक अनिल कुमार यादव यांनी सांगितले की, या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून या घटनेतील तीन आरोपींना अटक करण्यात आली असून इतरांचा तपास सुरू असून गुन्हा केलेल्या कोणाचीही अजिबात गय केली जाणार नसल्याचे त्यांनी सांगितले.

First published:

Tags: Gang Rape, Rape on minor, Uttar pradesh news