मराठी बातम्या /बातम्या /क्राईम /पुणे हादरलं! बंदुकीचा धाक दाखवून 14 वर्षीय मुलीवर सामूहिक बलात्कार, 5 जणांना अटक

पुणे हादरलं! बंदुकीचा धाक दाखवून 14 वर्षीय मुलीवर सामूहिक बलात्कार, 5 जणांना अटक

Gang rape in pune : पुण्यातील काही तरुणांनी एका 14 वर्षीय अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार (Gang rape in pune) केल्याची घटना समोर आली आहे.

Gang rape in pune : पुण्यातील काही तरुणांनी एका 14 वर्षीय अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार (Gang rape in pune) केल्याची घटना समोर आली आहे.

Gang rape in pune : पुण्यातील काही तरुणांनी एका 14 वर्षीय अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार (Gang rape in pune) केल्याची घटना समोर आली आहे.

पुणे, 29 मार्च: पुण्यात काही दिवसांपूर्वी एका संशयित युवकाकडे सापडलेल्या बंदुक प्रकरणाला आता वेगळं वळण लागलं आहे. संबंधित बंदुकीबाबत चौकशी करत असताना पुणे शहर पोलिसांनी एक धक्कादायक प्रकरण उघडकीस आणलं आहे. पोलिसांनी या प्रकरणाचे धागेदोरे दोन आठवड्यांपूर्वी झालेल्या सामुहिक बलात्काराशी जोडले आहेत. दोन आठवड्यांपूर्वी बंदुकीचा धाक दाखवत तीन तरुणांनी एका 14 वर्षीय अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार (Gang rape in pune) केला होता. याप्रकरणी पोलिसांनी पाच जणांना अटक (5 Arrest) केली असून त्यांची चौकशी केली जात आहे.

हे ही वाचा- Mansukh Hiren आणि सचिन वाझेंच्या त्या भेटीच्या VIDEO बद्दल धक्कादायक माहिती समोर

जप्त केलेल्या बंदुकीबाबत चौकशी करत असताना, दोन आठवड्यापूर्वी संबंधित बंदुकीतून एका अल्पवयीन मुलीवर गोळी चालवण्यात आल्याची माहिती पुणे पोलिसांनी मिळाली. त्यानंतर पोलिसांनी संबंधित अल्पवयीन मुलीचा शोध घेवून चौकशी केली असता तिने तिच्यावर सामूहिक बलात्कार झाल्याची माहिती पोलिसांना दिली. पोलिसांनी विश्वासात घेतल्यानंतर पीडित अल्पवयीन मुलीने गोळी चालवल्याच्या दिवशी तिच्यावर तीन तरुणांनी सामूहिक बलात्कार केला होता, अशी माहिती दिली.

'द इंडियन एक्सप्रेस'ने दिलेल्या वृत्तानुसार, दोन आठवड्यांपूर्वी 14 वर्षीय पीडित मुलगी आपल्या एका मैत्रिणीसोबत बाहेर गेली होती. यावेळी पीडितेच्या ओळखीच्या तीन तरुणांनी तिच्यावर सामूहिक बलात्कार केला. बलात्काराच्या घटनेनंतर पीडित मुलगी घटनास्थळावरून जात असताना, आरोपींना तिला काही वेळ थांबायला सांगितलं. आपला अजून एक मित्र आहेत, त्यामुळे तू कुठेही जावू नको, असं म्हणत आरोपींनी पीडित मुलीला अडवलं.

हे ही वाचा-अनैतिक संबंधातून गर्भवती महिलेचा बेदम मारहाणीत मृत्यू; लिव्ह इन पार्टनरला अटक

पण पीडित मुलीने याचा विरोध केला. त्यामुळे संतापलेल्या एका आरोपीने पीडित मुलीवर गोळी झाडली. ही गोळी पीडित मुलीच्या हातात असणाऱ्या मोबाईलवर लागली आणि सुदैवाने ती बचावली. गोळीबाराच्या घटनेनंतर आरोपींनी पीडितेची सुटका केली. पीडित मुलीने या प्रकरणाचा खुलासा केल्यानंतर दत्तवाडी पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी पाच जणांना अटक केली आहे. पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.

First published:

Tags: Gang Rape, Pune, Rape on minor