मराठी बातम्या /बातम्या /क्राईम /

नाशिक हादरलं, 13 वर्षांच्या अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार

नाशिक हादरलं, 13 वर्षांच्या अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार

 या प्रकरणी 5 पुरूष आणि एका महिलेला अटक करण्यात आली आहे.

या प्रकरणी 5 पुरूष आणि एका महिलेला अटक करण्यात आली आहे.

या प्रकरणी 5 पुरूष आणि एका महिलेला अटक करण्यात आली आहे.

  • Published by:  sachin Salve

लक्ष्मण घाटोळ, प्रतिनिधी

नाशिक, 10 जानेवारी :  नाशिक रोड  (nashik Road) पोलीस स्टेशनच्या हद्दीत एका 13 वर्षांच्या अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार (Gang Rape) करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या प्रकरणी 5 पुरूष आणि एका महिलेला अटक करण्यात आली आहे.

नाशिक रोड परिसरातील आरिंगळे मळ्यात ही घटना घडली आहे. आरिंगळे मळ्यात राहत असलेल्या पीडित मुलीवर शेजारीच राहणाऱ्या कुटुंबाने अत्याचार केला आहे. दोन दिवसांपूर्वी पीडित मुलीचा चाकूचा धाक दाखवून बलात्कार करण्यात आला होता.  त्यानंतर आज पुन्हा पीडित मुलीवर शेजारी राहणाऱ्या तरुणांनी पीडितेवर अत्याचार केला.

अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा यांना पहिल्यांदाच मिळाली सुरक्षा

पीडिते मुलीने आपल्यासोबत झालेल्या अत्याचाराची माहिती आईला दिली. त्यानंतर तिने नाशिक रोड पोलीस स्टेशनमध्ये धाव घेऊन तक्रार दाखल केली. पीडित आईच्या तक्रारीवरून पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नाशिक पोलिसांनी या प्रकरणी  सात संशयित आरोपींना ताब्यात घेतले आहे. यात एका महिलेचा देखील समावेश आहे.

शिक्षकाचा अल्पवयीन विद्यार्थिनीवर बलात्कार

दरम्यान, 6 जानेवारी रोजी रायगड (Raigad) जिल्ह्यातील  माणगाव तालुक्यातील जिल्हा परिषदेतील एका नराधम शिक्षकाने नापास करण्याची धमकी देऊन विद्यार्थिनीवर अत्याचार केल्याची संतापजनक घटना समोर आली होती. या प्रकरणी शिक्षकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

'बर्ड फ्लू'चा धोका वाढला! देशाच्या 7 राज्यांमध्ये पसरला

माणगाव तालुक्यातील  जिल्हा परिषद शाळेवर मदन वानखेडे हा शिक्षक म्हणून कार्यरत आहे. या शाळेत पीडित मुलगी शिकत असून तिची आईही शिक्षिका म्हणून नोकरी करीत आहे. मदन वानखेडे हा पीडित अल्पवयीन मुलीवर 2016 पासून अत्याचार करीत होता. पीडित मुलीला तुला नापास करेन आणि तुझ्या आईची नोकरी घालावेन, अशी धमकी देऊन हा नराधम शिक्षक तिच्यावर शरिरिक अत्याचार करीत होता. अखेर या नराधम शिक्षकाच्या अत्याचाराला न घाबरता या मुलीने आपल्यासोबत घडलेली हकीकत आईला सांगितली. त्यानंतर माणगाव पोलीस स्टेशनमध्ये मदन वानखेडे विरोधात तक्रार दाखल करण्यात आली असून अटक करण्यात आली आहे.

First published:

Tags: Gang Rape, सामूहिक बलात्कार