Home /News /crime /

बाजारातून परतणाऱ्या अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार; VIDEO व्हायरल झाल्यानंतर घटना उघड

बाजारातून परतणाऱ्या अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार; VIDEO व्हायरल झाल्यानंतर घटना उघड

इयत्ता नववीच्या वर्गात शिकणाऱ्या एका विद्यार्थिनीवर सामूहिक बलात्कार ( gang rape on 9th class student) केल्याची घटना समोर आली आहे. घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल (Viral video) झाल्यानंतर या घटनेला वाचा फुटली आहे.

    छपरा, 12 एप्रिल: इयत्ता नववीच्या वर्गात शिकणाऱ्या एका विद्यार्थिनीवर सामूहिक बलात्कार (gang rape on 9th class student) केल्याची घटना समोर आली आहे. गावातील ओढ्याजवळून घरी जात असताना तीन युवकांनी तिचा रस्ता अडवला आणि तिला गव्हाच्या शेतात घेऊन जात तिच्यावर सामूहिक बलात्कार केला आहे. आरोपी एवढ्यावरचं थांबले नाहीत, तर त्यांनी पीडितेवर बलात्कार करतानाचा व्हिडीओही काढला. घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल (Viral video) झाल्यानंतर या घटनेला वाचा फुटली आहे. पीडितेच्या पालकांनी संबंधित व्हिडीओ पाहिल्यानंतर घटनेची माहिती पोलिसांना देण्यात आली. याप्रकरणी पोलिसांनी एका आरोपीला अटक केली आहे. तर तर दोन आरोपी अद्याप फरार आहेत. दोन फरार आरोपींना पकडण्यासाठी पोलिसांनी आरोपींच्या भावांना ताब्यात घेतलं असून त्यांच्यावर दबाब बनवला जात आहेत. फरार आरोपींना लवकरच अटक करू असं आश्वासन स्थानिक पोलिसांनी दिलं आहे. संबंधित घटना बिहारमधील छपरा येथील आहे. पीडित विद्यार्थीनी 28 मार्च रोजी दुपारच्या वेळी खैरा बाजारातून आपल्या घरी परत येत होती. गावातील ओढ्याजवळ पोहचलं असता, याठिकाणी दबा धरून बसलेल्या तीन आरोपींनी तिच्यासोबत जबरदस्ती केली आणि तिला गव्हाच्या शेतीत नेलं. याठिकाणी नराधम आरोपींनी तिच्यावर सामूहिक बलात्कार केला. त्याचबरोबर आपल्या मोबाइलवर घटनेचा व्हिडीओही चित्रीत केला. यानंतर आरोपींनी पीडित मुलीला घटनेची वच्यता केल्यास जीवे मारण्याची धमकीही दिली. या घटनेची माहिती पीडितेनं कोणालाही दिली नाही. हे ही वाचा- पुण्यातील धक्कादायक घटना! IT कंपनीतील तरुणीवर कॅब चालकाचा बलात्कार पण घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर झाल्यानंतर, संबंधित व्हिडीओ पीडित मुलीच्या जवळच्या नातेवाईकांनी पाहिला. त्यानंतर हे सामूहिक बलात्कार प्रकरण समोर आलं आहे. या प्रकरणी पीडितेच्या नातेवाईकांनी खैरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी घटनेची माहिती मिळताच तातडीनं कारवाई करत एका आरोपीला अटक केली आहे. तर दोन आरोपी अद्याप फरार आहेत. खैरा पोलीस अन्य दोन आरोपींच्या शोधात असून घटनेचा तपास सुरू आहे.
    Published by:News18 Desk
    First published:

    Tags: Bihar, Crime news, Gang Rape, Shocking news, Viral

    पुढील बातम्या