गडचिरोली, 02 मार्च : गडचिरोली जिल्ह्यात अल्प किंमतीमध्ये शेतकऱ्यांकडून गायी म्हशीसह जनावरे खरेदी करुन तेलंगणाच्या कत्तलखाण्यात कत्तलीसाठी नेणाऱ्या एका टोळीला गडचिरोली पोलिसांनी अटक केली आहे. या आरोपीकडून तब्बल 1 कोटी 15 लाख 68 हजार रुपयांचा ऐवज पोलिसांनी जप्त केला आहे.
आरमोरी तालुक्यात ठाणेगाव मार्गावर ही वाहने थांबवून पोलीस तपासणी केली. या तपासणीत पाच ट्रकमधून तब्बल 141 गायी म्हशी आणि रेडे सापडले. या जनावरांची किंमत 17 लाख 55 हजार रुपये असून या आरोपींची तपासणी केल्यानंतर 1 लाख 13 हजार रुपयांची 10 मोबाईलही जप्त केली आहेत. जप्त केलेल्या वाहनांची किंमत 97 लाख रुपये आहे. एकूण 1 कोटी 15 लाख 68 हजार रुपयांचा ऐवज पोलिसांनी जप्त केला आहे.
दोन डोसची नाही गरज, एकच आहे पुरेसा; तिसरी कोरोना लस आहे अधिक स्ट्राँग
अटक केलेले आरोपी बहुतांश हे तेलंगणातले आहेत तर नागपूर आणि मध्यप्रदेश येथील ही काही आरोपी आहेत. ही जनावरे कत्तलीसाठी थेट हैदराबादला नेली जात असल्याची माहिती आहे. गडचिरोलीच्या सीमेवर आतापर्यंतची ही सर्वात मोठी कारवाई समजली जात आहे.
Sarkari Naukri: FCI मध्ये आहे सरकारी नोकरीची संधी, कुठे आणि कसं करणार अप्लाय?
राज्यात गोमांस विक्रीवर बंदी घालण्यात आली आहे. पण छुप्या मार्गाने मांस गायींची विक्री होत आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.