मराठी बातम्या /बातम्या /क्राईम /

वडिलांचं छत्र हरपलं आईनं वाढवलं, पण प्रेमात अडचण झाली म्हणून मुलीनं संपवलं

वडिलांचं छत्र हरपलं आईनं वाढवलं, पण प्रेमात अडचण झाली म्हणून मुलीनं संपवलं

प्रेमात अडसर ठरलेल्या आईचा मुलीने काटा काढला. प्रियकराच्या मदतीनं मुलीने आईची गळा आवळून हत्या केली. ही धक्कादायक घटना गडचिरोलीतील अहेरी इथे शुक्रवारी संध्याकाळी घडल्याची माहिती मिळाली आहे.

  • Published by:  Kranti Kanetkar
गडचिरोली,20 ऑगस्ट : प्रेमात लोक वेडे होतात पण एवढे वेडे की त्यांना आई-वडिलांचा विसर पडावा आणि त्यांच्याच जीवावर उठावं हे मात्र दुर्देव आहे. प्रेमासाठी मुलीनं चक्क तिच्या आईचाच काटा काढल्याची धक्कादायक घटना समोर आली. प्रेमात अडसर ठरलेल्या आईचा मुलीने काटा काढला. प्रियकराच्या मदतीनं मुलीने आईची गळा आवळून हत्या केली. ही धक्कादायक घटना गडचिरोलीतील अहेरी इथे शुक्रवारी संध्याकाळी घडल्याची माहिती मिळाली आहे. निर्मला आत्राम असं या मृत महिलेचं नाव असून पोलिसांनी मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला आहे. तर मुलगी आणि तिचा प्रियकर दोघांनाही पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. निर्मला यांच्या मुलीने प्रेमासाठी प्रियकारासोबत मिळून आईला मारण्याचा कट रचल्याचा संशय आहे. पत्नीचे विवाहबाह्य संबंध, पतीने समजूतही काढली, पण...तरुणाने उचललं भयानक पाऊल या प्रकरणी आत्राम यांचा मृतदेह शवविच्छेदनासाठी उपजिल्हा रुग्णालयात आणण्यात आला आहे. या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. या मुलीचे वडील पोलीस विभागात होते. मात्र २० वर्षांपूर्वी त्यांची हत्या झाल्याची माहिती मिळाली आहे. तेव्हापासून या मुलीला आईनंच लहानाचं मोठं केलं. एव्हरग्रीन हॉटेलमध्ये प्रेयसीला नेलं, नंतर वाद, नाराज प्रियकराचं टोकाचं पाऊल, गोंदियातील धक्कादायक प्रकार आईची हत्या करणाऱ्या मुलीला ताब्यात घेतलं असून पोलिसांकडून चौकशी सुरू आहे. मुलीला वडिलांच्या जागी अनुकंपावर नोकरी मिळण्याची शक्यता होती. मात्र आता हत्येच्या आरोपाखाली तिला गजाआड जावं लागणार आहे.
First published:

Tags: Crime news, Gadchiroli, Love

पुढील बातम्या