• Home
 • »
 • News
 • »
 • crime
 • »
 • जर्मन शेफर्डला घाबरुन तरुण पळू लागला; तिसऱ्या मजल्यावरुन खाली पडल्याने मृत्यू

जर्मन शेफर्डला घाबरुन तरुण पळू लागला; तिसऱ्या मजल्यावरुन खाली पडल्याने मृत्यू

शेजारच्यांनी जर्मन शेफर्ड या कुत्र्याचा पट्टा काढला होता, शिवाय त्यांनी दारही खुलं ठेवलं होतं. तरुणाला पाहून कुत्रा त्याचा मागे पळू लागला.

 • Share this:

  फरीदाबाद, 28 जून : सैनिक कॉलनीतील अचिवर्स सोसायटीत राहणाऱ्या एका खासगी इन्शूरन्स कंपनीच्या सीनियर एक्जीक्युटीव्हला शेजारच्यांच्या पाळीव कुत्र्यामुळे जीव गमवावा लागला आहे. कुत्रा त्यांच्या मागे लागल्यानंतर ते पुरते घाबरले आणि ते पळत सुटले. त्यांच्या मृत्यूनंतर कुटुंबीयांनी कुत्र्याच्या मालकाविरोधात तक्रार दाखल केली आहे. (Frightened by the German Shepherd the young man fled Death by falling from the third floor) अचिवर्स सोसायटीतील गिरीश स्वरुप माथर (75) कुटुंबासह सहाव्या मजल्यावर राहतात. रविवारी सकाळी 11.30 वाजता त्यांचा मुलगा समीर (40) घरीच होता. तो एक खासगी इन्शूरन्स कंपनीत सीनिअर एक्जीक्यूटिव्ह होते. ते एका कामासाठी पायऱ्यांवरून खाली उतरत होते. जेव्हा ते चौथ्या मजल्यावर पोहोचले तेव्हा शेजारील राहणाऱ्या संजीव भदौरिया यांचा पाळीव कुत्रा जर्मन शेफर्ड समीरच्या मागे पळू लागला. हे ही वाचा-धक्कादायक! भावाला लोखंडी रॉडने जबर मारहाण; शेतीच्या वादातून घेतला जीव समीर कुत्र्यापासून वाचण्यासाठी तिसऱ्या मजल्यावरुन खाली पडले. वडील गिरीश माथुर यांचा आरोप आहे की, या प्रकरणात त्यांचा मुलगा समीरचा मृत्यू शेजारील संजीव भदौरियाने पाळीव कुत्रा जर्मन शेफर्डमुळे झाला आहे. कारण संजीव भदौरियाने आपल्या फ्लॅटचा दरवाजा आणि कुत्रा दोन्ही खुला ठेवला होता.

  Published by:Meenal Gangurde
  First published: