लखनऊ, 11 डिसेंबर : उत्तर प्रदेशच्या लखनऊमध्ये एका डेन्टिस्टने काही दिवसांपूर्वी सना उर्फ तबस्सुम फातिमा ऊर्फ देवांशीची ओळख करून दिली. दोघांमध्ये मैत्री झाली. मोबाइल नंबर एक्सचेंज झाले. सनाने डॉक्टरांना भेटायला बोलवलं. दोघांची चार वेळा तरी भेट झाली.
1 डिसेंबर रोजी सनाने सुशांत गोल्फ सिटीमधील ओमॅक्स अपार्टमेंटच्या 1302 क्रमांकाच्या फ्लॅटवर डॉक्टरांना बोलावलं. यावेळी ती म्हणाली की, तिची बहीण नीशू उर्फ कहकशाही तिच्यासोबत आहे. तिचीही भेट होईल. जेव्हा पीडित ठरलेल्या ठिकाणी पोहोचला, तेथे सना, कहकशा यांच्याशिवाय इतर पाच लोक तेथे उपस्थित होते. सर्वांनी मिळून त्याला ओलिस ठेवले. त्याचा अश्लील व्हिडीओ बनविला.
अश्लील व्हिडीओ तयार केल्यानंतर आरोपींनी त्याच्याकडून 30 लाख रुपये मागितले. पैसे दिले नाही तर व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी दिली. पोलिसांनी याचा तपास केल्यास हा हनी ट्रॅपच्या माध्यमातून लोकांना फसवून ब्लॅक मेल करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश झाला. पोलिसांनी गुरुवारी टोळीतील दोन सदस्य सचिन रावत आणि नीशू उर्फ कहकशा यांना अटक केली. तर आदिल, बलराम वर्मा, प्रवेश जायस्वाल, नजर अब्बास आणि सना फरार आहे.
2 डिसेंबर रोजी गुन्हा दाखल
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गुडंबा परिसरातील पीडित डॉक्टरने 2 डिसेंबर रोजी विभूती खंड पोलीस स्टेशनमध्ये अपहरण, प्राणघातक हल्ला आणि खंडणी मागितल्याचा गुन्हा दाखल केला होता. एसीपी विभूतीचंद स्वतंत्र सिंह म्हणाले की, आरोपी आदिल, सचिन रावत, बलराम वर्मा, प्रवेश जैस्वाल आणि नजर अब्बास मित्र आहेत तर सना आदिलची पत्नी आहेत.
30 लोकांना केलं ब्लॅकमेल
बलराम आणि परवेश हे दोघे गोल्फ सिटी परिसरातील ओमॅक्स बिल्डिंग फेस -2 मधील मित्राच्या फ्लॅटमध्ये राहत होते. प्राथमिक चौकशीत या टोळीने सुमारे 30 जणांना अडकवून त्यांच्याकडून पैसे काढून घेतल्याचे उघडकीस आले आहे. पोलिसांनी टोळीकडून फसवणूक केलेल्या पीडितांना पुढे येऊन गुन्हा नोंदवण्याचं आवाहन केलं आहे.
ड्रग्स देऊन बनवला व्हिडीओ
डॉक्टरांनी आपल्या तक्रारीत म्हटले आहे की तो फ्लॅटमध्ये पोहोचताच आरोपीने त्याच्या खिशातून 30 हजार रुपये काढून घेतले. तिने त्याच्या पर्समधून डेबिट कार्डही काढले. त्याला पिन क्रमांकही विचारला, तो चूकीला निघाल्याने तिने त्याला मारहाण केली.
यानंतर पीडितेने जबरदस्तीने त्याला अमली पदार्थ प्यायला लावला आणि कहकशासोबत अश्लील व्हिडिओ तयार केला. दुसर्याच दिवशी जेव्हा डॉक्टर जागे झाले तेव्हा आरोपीने पैसे दिले नाही तर व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी दिली. तसेच त्यांनी पोलिसांकडे तक्रार केल्यास ते त्यांच्या मुलांना ठार मारतील असेही यात म्हटले आहे.
पीडित डॉक्टरने 2 डिसेंबर रोजी आपल्या डॉक्टर मित्राकडून आरोपींना देण्यासाठी 2 लाख रुपये मागितले. त्यावेळी मित्राने त्यांना पोलिसात तक्रार करण्यास सांगितले
. आरोपींनी कार क्लिनिककडून काही वेळा पूर्वी डॉक्टरकडे रोख रकमेची मागणी केली होती. दरम्यान डॉक्टरने तेथून पळ काढला आणि पोलीस ठाण्यात सर्व प्रकार सांगितला.
हनी ट्रॅपमधून कसे वाचाल
- सोशल मीडियावर अज्ञात लोकांशी मैत्री करु नका.
- कोणत्याही अज्ञात व्यक्तीने अचानक सोशल मीडिया किंवा व्हॉट्सअॅपवरुन ओळख वाढविण्यास सुरुवात केली तर सावध रहा.
- आपले वैयक्तिक फोटो किंवा माहिती सोशल मीडियावरील मित्रांसोबत शेअर करू नका.
- पीडित व्यक्ती पोलीस, सायबर क्राइम सेल किंवा यूपीकॉप अॅपद्वारे तक्रार करू शकते.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.