हिसार, 6 फेब्रुवारी : देशात दिवसेंदिवस गुन्हेगारीच्या घटनांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून ओळख झाल्यावर फसवणुकीचे, तसेच लैंगिक शोषणाचेही प्रकार समोर आले आहेत. यातच आता आणखी एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहिल्यानंतर बलात्काराचे दोन गुन्हे दाखल झाले आहेत.
काय आहे संपूर्ण प्रकरण -
हरियाणातील हिसार जिल्ह्यातील हा प्रकार आहे. हिस्सार येथील एका परिसरात लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहणाऱ्या महिलेने चुली खुर्द येथील रहिवासी प्रमोद उर्फ गोलू याच्याविरुद्ध बलात्कार आणि अनैसर्गिक शारीरिक संबंध ठेवल्याचा गुन्हा दाखल केला आहे. महिलेने सांगितले की, वर्षभरापूर्वी तिची आरोपीसोबत इंस्टाग्रामवर ओळख झाली होती. या ओळखीनंतर त्यांच्यात मैत्री झाली होती.
नंतर लग्नाचे आमिष देत आरोपी प्रमोद तिच्यासोबत सातत्याने शारिरीक संबध ठेवत बलात्कार केला. तसेच तो तिला मारहाणही करायचा. तिने तक्रार केली. मात्र, पुन्हा लग्नाचे आमिष देऊन तिने ती तक्रार मागे घेतली. मात्र, आता 2 फेब्रुवारीला दारू पिऊन घरी आला तसेच तिच्यासोबत त्याने दुष्कर्म केले. याप्रकरणी महिला ठाणे पोलिसांनी तक्रार दाखल केली आहे.
हेही वाचा - संसारासाठी नवरा सौदी अरेबियात, बायको प्रियकरासोबत सापडली आक्षेपार्ह अवस्थेत
दुसरी घटना - आरोपी कर्जाचा हप्ता घेण्यासाठी येत असे आरोपी -
दुसऱ्या घटनेत शिवणी येथील दिनेश नावाच्या व्यक्तीने सातरोड रोडजवळ भाड्याच्या घरात लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहणाऱ्या महिलेवर बलात्कार केला. महिलेच्या तक्रारीवरून पोलिसांनी आता गुन्हा दाखल केला आहे. महिलेने सांगितले की, दिनेश हा बँकेच्या कर्जाचा हप्ता घेण्यासाठी तिच्याकडे येत असे. त्यादरम्यान त्यांची ओळख झाली. नंतर एका हॉटेलमध्ये घेऊन जाऊन त्याने तिच्यासोबत दुष्कर्म केले.
तसेच नंतर लग्नाच्या बहाण्याने त्याने तिला घटस्फोटही करवून दिला. यानंतर ते दोन्ही सोबत भाड्याच्या घरात लिव्ह इनमध्ये राहू लागले होते. मात्र, 24 जानेवारीला त्याने तिच्यावर बलात्कार केला. तसेच जीवे मारण्याची धमकीही देत असल्याचा आरोप महिलेने केला आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Crime news, Haryana