मराठी बातम्या /बातम्या /क्राईम /

मैत्री, प्रेम, लग्न अन्; नवा संसार सुरू केल्याच्या 8 व्या महिन्यात तरुणाची आत्महत्या

मैत्री, प्रेम, लग्न अन्; नवा संसार सुरू केल्याच्या 8 व्या महिन्यात तरुणाची आत्महत्या

एका सॉफ्टवेअर इंजिनियर सौरभ शिंदे यांनी विष घेऊन आत्महत्या केली.

एका सॉफ्टवेअर इंजिनियर सौरभ शिंदे यांनी विष घेऊन आत्महत्या केली.

एका सॉफ्टवेअर इंजिनियर सौरभ शिंदे यांनी विष घेऊन आत्महत्या केली.

  • Published by:  Meenal Gangurde

इंदूर, 17 डिसेंबर : कुटुंबीयांनी विरोध करून इंजिनियर तरुणाने प्रेम असलेल्या तरुणीसोबत लग्न (Love Marriage) केलं. मात्र लग्नाच्या पाच महिन्याच्या आत प्रेमात वाद झाला आणि शेवटी इंजिनिअर पतीने विष घेऊन स्वत:चाच जीव (Suicide Case) घेतला. या घटनेनंनतर मुलाच्या वडिलांनी सुनेवर गंभीर आरोप लावले व सून जयावर संशय व्यक्त केला.

ती अनेकदा सौरभला मारहाण करीत होती, याशिवाय जेवणही देत नव्हती. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पोस्टमार्टम रिपोर्ट आल्यानंतरही मृत्यूचं कारण कळेल. सध्या या प्रकरणात तपास सुरू आहे.

मध्य प्रदेशातील इंदूरच्या द्वारकापुरी पोलीस ठाणे हद्दीत राहणाऱ्या एका सॉफ्टवेअर इंजिनियर सौरभ शिंदे यांनी विष घेऊन आत्महत्या केली. घटनेनंतर तरुणाला तातडीने रुग्णालयात नेण्यात आलं. येथे डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केलं. पोलीस ठाण्याचे प्रमुख सतीश द्विवेरी यांनी दिलेल्या माहितीनुसार, ही घटना गुरुवारी दुपारी घडल्याचं सांगितलं जात आहे. पोलिसांना जिल्हा रुग्णालयाकडून याबाबत सूचना मिळाली होती. पाच महिन्यांपूर्वी जया नावाच्या तरुणीसोबत त्याचं लग्न झालं होतं. दोघांचं लव्ह मॅरेज होतं, त्यामुळे ते कुटुंबापासून वेगळं राहत होते.

सूनेने दिलं विष, पतीच्या वडिलांचा आरोप...

सौरभचे वडील सुभाष शिंदे यांनी आरोप केला होता की, तरुणी जया आणि सौरभ यांनी 19 जुलै 2021 रोजी प्रेम विवाह केला होता. यापूर्वी मुलीच्या कुटुंबीयांना लग्नासाठी मंजुरी मिळवण्याचा प्रयत्न केला जात होता, मात्र त्यांच्यापैकी कोणीच तयार नव्हते. शेटी सौरभ आणि जया यांनी लग्न केलं. ते दोघेही द्वारकापुरी भागात एका भाडेतत्वावर घेतलेल्या घरात राहत होते. लग्नानंतर एकदा सौरभने आपल्या वडिलांना फोन केला होता. फोनवर सौरभने त्याची प्रकृती ढासळत असल्याचं सांगितलं. मात्र सौरभच्या वडिलांना तो कुठे राहतो याबाबतही माहिती नव्हतं.

हे ही वाचा-मॅट्रिमोनिअल साईट्समुळे कोट्यवधींचा गंडा; ठाण्यातील तरुणीसोबत धक्कादायक प्रकार

8 महिन्यांपासून होता बेरोजगार...

सौरभच्या वडिलांनी सांगितलं की, लग्नानंतर दोघेही वेगळं राहत होते. तर सौरभ गुजरातमधील हिताची कंपनीत काम करीत होता. मात्र गेल्या 8 महिन्यांपासून तो बेरोजगार होता. वडिलांनी आरोप केला आहे की, सौरभच्या आत्महत्येमागे त्याची पत्नी जयावर संशय आहे. कारण जया त्याच्यावर संशय घेत होती, आणि त्याला नोकरीवर जाऊ देत नव्हती. तरुणी सौरभला मारहाणदेखील करीत असे. याशिवाय त्याला जेवणही देत नव्हती. या सर्वांमुळे सौरभने आत्महत्या केल्याचा आरोप त्याच्या वडिलांनी केला आहे. या प्रकरणात सतीश द्विवेदी यांनी सांगितल की, पोस्ट मार्टम रिपोर्ट आल्यानंतर नेमका प्रकार स्पष्ट होईल. मात्र प्राथमिक तपासानुसार सौरभने विषारी पदार्थ खाऊन आत्महत्या केल्याचं दिसून येत आहे.

First published:

Tags: Madhya pradesh, Suicide, Wife and husband