लखनऊ, 7 जुलै : उत्तर प्रदेशातील (Uttar Pradesh) गाजियाबादमध्ये मंगळवारी रात्री बॅचलर्स पार्टीदरम्यान ( Bachelors Party) एका तरुणाचा मृत्यू झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. मृत तरुणाच्या वडिलांनी आरोप केला आहे की, त्याच्या मित्रांनी हत्या करून त्याचा मृतदेह रुग्णालयाबाहेर सोडून पळून गेले. पोलिसांनी या प्रकरणात दोघांना अटक केली असून त्यांची चौकशी सुरू आहे. (Friends death at the Bachelors Party )
साहिबाबादमधील लाजपतनगर येथे राहणारा तरुण सूरज राय मंगळवारी रात्री आपला मित्र हिमांशुच्या घरी गेला होता. हिमांशू यांचं बुधवारी लग्न होणार होतं. त्यामुळे त्याने घरी मित्रांसाठी बॅचलर्स पार्टी ठेवली होती. यामध्ये हिमांशु, सूरज, हरिओम, विक्की आणि काही अन्य मित्र सामील झाले. मिळालेल्या माहितीनुसार, बॅचलर्स पार्टीमध्ये सर्वांनी खूप दारू प्यायली. यामध्ये त्यांच्यामध्ये काहीतरी वाद झाला व त्यात बंदुकीची गोळी चालवण्यात आली. ही गोळी सूरजच्या पोटात लागली. तो जागेवरच तडफडू लागला. हिंमाशू आणि त्याच्या इतर मित्रांनी जखमी अवस्थेत सूरजला मॅक्स रुग्णालयातील आपात्कालीन विभागात सोडून पळ काढला. तेथेच सूरजचा मृत्यू झाला.
हे ही वाचा-पत्नीपासून दूर जाण्यासाठी नवीन लग्न झालेल्या तरुणाने घेतली 'कोरोना'ची मदत
वडिलांचा आरोप, मुलाची केली हत्या
सूरजचे वडील विनोद कुमार राय यांचा आरोप आहे की, त्याच्या मित्रांनीच त्याची हत्या केली. सूरजच्या वडिलांनी त्याचे मित्र हिमांशु शर्मा, हरिओम त्यागी, विक्की सिंह आणि इतर मित्रांविरोधात हत्येचा आरोप केला असून त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी या प्रकरणात चौकशी सुरू केली आहे. बॅचलर पार्टीमध्ये आनंदात फायरिंग करण्यात आली होती, त्यात गोळी लागल्यामुळे सूरजचा मृत्यू झाल्याची माहिती पोलिसांना देण्यात आली आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Crime news, Marriage, Uttar pradesh