Home /News /crime /

मैत्रिणीच्या नावानं फेसबुक अकाउंट काढून मित्रानं केला कांड; दोस्ताचा कारनामा पाहून महिलेला बसला धक्का

मैत्रिणीच्या नावानं फेसबुक अकाउंट काढून मित्रानं केला कांड; दोस्ताचा कारनामा पाहून महिलेला बसला धक्का

Crime in Mumbai: नालासोपाऱ्यातील एका व्यक्तीनं सोशल मीडियावर (Social media) आपल्या मैत्रिणीच्या नावे बनावट खातं (fake account) काढून संतापजनक कृत्य केलं आहे.

    विरार, 15 मे: नालासोपाऱ्यातील एका व्यक्तीनं सोशल मीडियावर (Social media) आपल्या मैत्रिणीच्या नावे बनावट खातं (fake account) काढून बदनामी केल्याची संतापजनक घटना समोर आली आहे. आरोपी मित्रानं आपल्या मैत्रिणीचे फोटो सोशल मीडियावर पोस्ट करत त्यासोबत अश्लील मजकूर  प्रसारित केला आहे. यामुळे पीडित महिलेला भलतेच फोन यायला लागल्यानंतर संबंधित प्रकरण तिच्या लक्षात आलं.  याप्रकरणी पीडित महिलेनं नालासोपारा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. पोलीस आरोपी मित्राचा शोध घेत आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संबधित 43 वर्षीय पीडित महिला नालासोपाऱ्यातील पश्चिम परिसरात राहते. पीडितेच्या एका मित्रानं तिच्या नावानं फेसबुकवर एक बनावट खातं (Facebook fake account) काढलं. या फेक अकांऊटवरून आरोपी मित्रानं आपल्या मैत्रिणीचे फोटो प्रसारीत केले. सोबतचं वेश्याव्यवसाय करत असल्याची माहिती पोस्ट करून तिचा मोबाईल नंबरही शेअर केला. यानंतर पीडितेला अनेकांचे भलत्या कारणासाठी फोन येऊ लागले. नेमकं प्रकरण काय आहे? हे सुरुवातीला तिच्याही लक्षात आलं नाही. पण कालांतराने तिनं व्यवस्थित तपास केला असताना. तिच्यासोबत घडलेला प्रकार तिच्या लक्षात आला. यानंतर तिने थेट नालासोपारा पोलीस ठाण्यात जाऊन आपल्या मित्राविरोधात गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी पोलिसांनी महिलेची रितसर तक्रार दाखल करून घेतली असून सर्व पुरावे गोळा करण्याचं काम सुरू केलं आहे. तसेच नालासोपारा पोलीस सध्या आरोपी मित्राचा शोध घेत आहेत. हे वाचा-लॉकडाऊनमध्ये स्पा सेंटरच्या नावाखाली सुरू होतं घृणास्पद कृत्य; छापेमारीचा VIDEO खरंतर, कोरोना लॉकडाऊनच्या काळात सायबर गुन्ह्यांमध्ये प्रचंड वाढ झाली आहे. शहरी भागातून दररोज शेकडो गुन्ह्यांची नोंद होतं आहे. हे सायबर गुन्हेगार बदनामी सोबतचं आर्थिक फसवणूकही करत आहेत. त्यामुळे बदनामीचा किंवा आर्थिक फसवणूकीचा प्रकार आढळल्यास त्वरित पोलिसांशी संपर्क साधण्याचं आवाहन पोलिसांकडून करण्यात येत आहे.
    Published by:News18 Desk
    First published:

    Tags: Crime news, Cyber crime, Facebook

    पुढील बातम्या