Home /News /crime /

मोबाईलच्या वादातून मित्रासोबत धक्कादायक कृत्य; आरोपी आणि मृत मुलगाही अल्पवयीन

मोबाईलच्या वादातून मित्रासोबत धक्कादायक कृत्य; आरोपी आणि मृत मुलगाही अल्पवयीन

बिहारमधील पश्चिम चंपारण (West Champaran) जिल्ह्यातील बगहा येथून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. मोबाईलसाठी मित्राने आपल्याच मित्राचा गळा चिरून खून केला आहे. (Friend Murder by Friend) या घटनेमुळे परिसरात सर्वत्र खळबळ उडाली आहे.

  बगहा (पश्चिम चंपारण), 14 मे : बिहारमधील पश्चिम चंपारण (West Champaran) जिल्ह्यातील बगहा येथून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. मोबाईलसाठी मित्राने आपल्याच मित्राचा गळा चिरून खून केला आहे. (Friend Murder by Friend) या घटनेमुळे परिसरात सर्वत्र खळबळ उडाली आहे. खुनी अल्पवयीन असून ज्याचा खून झाला तोही अल्पवयीन होता. गंभीर असल्याने जिल्हा रुग्णालयात केले दाखल -  मोबाईलवरून झालेल्या वादातून ही घटना घडली आहे. आरोपी अल्पवयीन मुलाने त्याच्या मित्राला शहरापासून एक किलोमीटर अंतरावर असलेल्या गंडक नदीच्या काठावर नेले. यानंतर त्याची हत्या केली, असे सांगण्यात येत आहे. साहिल अंसारी (उम्र 14 वर्ष) असे मृताचे नाव आहे. तर साधु यादव असे आरोपीचे नाव आहे. साहिल गंभीर अवस्थेत घरी पोहोचला. यानंतर त्याला त्याच्या नातेवाईकांनी रुग्णालयात दाखल केले. मात्र, त्याची अवस्था आणखीनच गंभीर झाल्याने त्याला जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. मित्राने सायंकाळी उशिरा बोलावले एक किमी दूर -  जिल्हा रुग्णालयात उपचारानंतर त्याचा मृत्यू झाला. ही घटना बगहाच्या नरईपूर भागातील आहे. गुरुवारी सायंकाळच्या सुमारास ही घटना घडली. नगरच्या नारायणपूर भागातील रहिवासी साधु यादव याने आपला मित्र साहिल अंसारी याला त्याच्या घरून सायंकाळी उशिरा बोलावले. यानंतर जवळपास एक किमी दूर गंडक नदीच्या किनाऱ्यावर घेऊन गेला. याठिकाणी त्याने त्याचा गळा चिरुन हत्या केली. हेही वाचा - डॉक्टरची आत्महत्या; आधी व्हॉट्सअॅपवर स्टाफला केला मेसेज, म्हणाला....
  घटनेनंतर परिसरात तणावाचे वातावरण - 
  घटनेची माहिती मिळताच पटखौली पोलीस घटनास्थळी हजर झाले. यानंतर पोलिसांनी आरोपी साधु यादव याला ताब्यात घेतले आहे. पटखौली ओपीचे प्रभारी लालबाबू यादव यांनी सांगितले की, मोबाईल फोनवरून हा वाद उद्भवला असे दिसत आहे. आरोपी साधु यादव याला ताब्यात घेण्यात आले आहे. त्याची कसुन चौकशी केली जात आहे. तर साहिलच्या मृत्यूनंतर परिसरात तणावाचे वातावरण तयार झाले आहे.
  Published by:News18 Desk
  First published:

  Tags: Bihar, Crime news, Murder news

  पुढील बातम्या