मराठी बातम्या /बातम्या /क्राईम /

ना नोकरी मिळाली ना पैसे, सरकारी नोकरीच्या नावाखाली 7 जणांसोबत घडलं भयानकच

ना नोकरी मिळाली ना पैसे, सरकारी नोकरीच्या नावाखाली 7 जणांसोबत घडलं भयानकच

तरुणाने 7 वेगवेगळ्या लोकांकडून तब्बल 9 लाख 50 हजारांची फसवणूक केली आहे.

तरुणाने 7 वेगवेगळ्या लोकांकडून तब्बल 9 लाख 50 हजारांची फसवणूक केली आहे.

तरुणाने 7 वेगवेगळ्या लोकांकडून तब्बल 9 लाख 50 हजारांची फसवणूक केली आहे.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Chhattisgarh, India
  • Published by:  Khushalkant Dusane

कवर्धा, 18 नोव्हेंबर : सरकारी नोकरीच्या नावावर फसवणूक झाल्याच्या अनेक घटना याआधी समोर आल्या आहेत. मात्र, यानंतर आता आणखी एक धक्कादायक घटना समोर आली आहे. नोकरी देण्याच्या नावाखाली 7 वेगवेगळ्या लोकांची आर्थिक फसवणूक केल्याचे प्रकरण उघडकीस आल्यानंतर खळबळ उडाली आहे. याप्रकरणी एका तरुणाला अटक केली आहे.

काय आहे संपूर्ण प्रकरण -

तरुणाने 7 वेगवेगळ्या लोकांकडून तब्बल 9 लाख 50 हजारांची फसवणूक केली आहे. अनेक दिवसांपासून आरोपी बेरोजगार तरुणांना चकरा मारायला लावत होता. त्या मुलांना ना नोकरी मिळत होती ना तो पैसे परत करत होते. यामुळे व्यथित झालेल्या बेरोजगार तरुणांनी पोलिसात तक्रार केली. यानंतर दुर्ग जिल्ह्यातील जामगल (रा.) येथील रहिवासी पुकार चंद्राकर याला अटक करण्यात आली आहे. त्याला न्यायालयात हजर केले असता तेथून त्याची कारागृहात रवानगी करण्यात आली.

नोकरी देण्याच्या नावाखाली 9 लाख 50 हजारांची फसवणूक -

पिपरिया पोलीस ठाण्यात सुखराम साहू यांचा मुलगा नरेंद्र साहू याने पिपरिया पोलीस ठाण्यात लेखी तक्रार दाखल केली. पीडितेने पोलिसांना दिलेल्या जबानीत सांगितले की, 28 जानेवारी 2022 ते 28 फेब्रुवारी 2022 दरम्यान जामगाव (रा.) येथील गंडलाल चंद्राकर यांचा मुलगा पुकार चंद्राकर याने डाटा एन्ट्री ऑपरेटर आणि हॉस्पिटल अटेंडंट या पदावर नियुक्तीसाठी पैसे घेतले होते.

यामध्ये नरेंद्र साहू यांच्याकडून 1 लाख रुपये, दुर्गेश साहू यांच्याकडून 3 लाख रुपये, रमेश कुंभकर यांच्याकडून 1 लाख रुपये, हरिराम साहू यांच्याकडून 1 लाख रुपये, पंचराम साहू यांच्याकडून 1 लाख रुपये, अमित साहू याच्याकडून 1 लाख 50 हजार रुपये आणि रोहित चंद्रवंशी याच्याकडून 1 लाख रुपये देण्यात आले आहेत. अशी एकूण 9 लाख 50 हजार रुपयांची फसवणूक त्याने केली.

हेही वाचा - ती घरातही सुरक्षित नाही! वडील, चुलते आणि आजोबांकडूनच मुलीवर 6 वर्ष बलात्कार

याप्रकरणी एसएसपी मनीषा ठाकूर रावते यांनी सांगितले की, स्टेशन प्रभारी पिपरिया यांच्या नेतृत्वाखाली पोलीस स्टेशनमध्ये एक पथक तयार करण्यात आले आणि अहवालाच्या आधारे सोमवारी आरोपीला अटक करण्यात आली. यानंतर त्याला न्यायालयीन कोठडीवर हजर करण्यात आले. येथून त्याची रवानगी तुरुंगात करण्यात आली आहे. याप्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहेत.

First published:

Tags: Crime news, Money fraud