Home /News /crime /

मुंबईत फ्लॅट घेण्याच्या बहाण्याने फसवणूक, तब्बल 13 लाख 85 हजारांचा फ्रॉड

मुंबईत फ्लॅट घेण्याच्या बहाण्याने फसवणूक, तब्बल 13 लाख 85 हजारांचा फ्रॉड

मुंबईत फ्लॅट खरेदी करण्याच्या बहाण्याने एकाची फसवणूक (Fraud under the pretext of buying a flat) केल्याचा प्रकार समोर आला आहे. तब्बल 13 लाख 85 हजारांची फसवणूक केली गेली आहे.

  नंदुरबार, 17 मे : मुंबईत फ्लॅट खरेदी करण्याच्या बहाण्याने एकाची फसवणूक (Fraud under the pretext of buying a flat) केल्याचा प्रकार समोर आला आहे. तब्बल 13 लाख 85 हजारांची फसवणूक केली गेली आहे. याप्रकरणी नंदुरबार आणि मुंबई येथील दोघांविरोधात नंदुरबार पोलीस ठाण्यात (Nandurbar Police Station) फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जयंतीलाल भिलचंद कासार असे फसवणूक झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. तर राजन चिमनलाल शाह (रा. गिरीविहार सोसायटी, नंदुरबार) आणि घनश्याम राजदेव सिंग (रा. चेंबूर, मुंबई) अशी संशयित आरोपींची नावे आहेत. काय आहे नेमकं प्रकरण? नंदुरबार येथील वृंदावन कॉलनीत राहणारे जयंतीलाल भिलचंद कासार यांना मुंबईत घर खरेदी करायचे होते. यासाठी मुंबईतील माटुंगा भागत फ्लॅट खरेदी करुन देण्यासाठी राजन चिमनलाल शाह आणि घनश्याम राजदेव सिंग यांनी कासार यांचा विश्वास संपादन करण्याचा प्रयत्न केला. त्यात ते यशस्वी झाले. यानंतर त्यांनी आपली चाल खेळली. कासार यांनी या दोघांच्या सांगण्याप्रमाणे 60 लाख रुपयांच्या फ्लॅटसाठी 50 हजार रुपये टोकन म्हणून दिले. त्यानंतर आरटीजीएसच्या माध्यमातून 15 लाख रुपये हे डिसेंबर 2020 मध्ये पाठवले. मात्र, यानंतरही त्यांना फ्लॅटचा ताबा मिळाला नाही. म्हणून पैसे मिळावेत अशी मागणी कासार यांनी केली. कासार यांच्या मागणीनंतर 15 लाख 50 हजार पैकी फक्त 1 लाख 65 हजार रुपये त्यांना परत करण्यात आले. यामुळे आपली 13 लाख 85 हजार रुपयांची फसवणूक झाल्याचे कासार यांच्या लक्षात आले. हेही वाचा - Pune: स्मृती इराणींच्या कार्यक्रमात राष्ट्रवादीच्या महिला पदाधिकाऱ्याला मारहाण, भाजपच्या तिघांवर गुन्हा दाखल
  यानंतर त्यांनी फसवणूक केल्याप्रकरणी राजन चिमनलाल शाह (रा. गिरीविहार सोसायटी, नंदुरबार) आणि घनश्याम राजदेव सिंग (रा. चेंबूर, मुंबई) या दोघांच्या विरोधात नंदुरबार शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. कासार यांनी दिलेल्या फिर्यादीनंतर दोन्ही आरोपींविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी पोलीस निरीक्षक किरणकुमार खेडकर हे पुढील तपास करत आहेत.
  Published by:News18 Desk
  First published:

  Tags: Financial fraud, Mumbai, Police

  पुढील बातम्या