Home /News /crime /

WhatsApp युजर्स चोरट्यांच्या निशाण्यावर; नोकरी आणि फ्री व्हिसाचं आमिष दाखवत असतील तर सावधान!

WhatsApp युजर्स चोरट्यांच्या निशाण्यावर; नोकरी आणि फ्री व्हिसाचं आमिष दाखवत असतील तर सावधान!

यूकेमध्ये मोफत व्हिसा आणि नोकरीचे फायदे सांगत युजर्सची फसवणूक केली जात आहे. हा नवीन व्हॉट्सअ‍ॅप स्कॅम यूके सरकारच्या एका मेसेजशी संबंधित आहे.

  नवी दिल्ली, 06 जुलै : हल्ली ऑनलाइन फ्रॉडचं (Online Fraud) प्रमाण खूप वाढलंय. सायबर गुन्हेगार मेसेज किंवा कॉलद्वारे लोकांची फसवणूक करून पैसे लांबवतात. आता सर्वांत लोकप्रिय इन्स्टंट मेसेजिंग अ‍ॅप व्हॉट्सअ‍ॅपवर (WhatsApp) एक नवीन फिशिंग स्कॅम सुरू झाला आहे. यूकेला जाण्यासाठी इच्छुक असणाऱ्यांना या स्कॅमच्या माध्यमातून लक्ष्य केलं जातंय. यूकेमध्ये मोफत व्हिसा आणि नोकरीचे फायदे सांगत युजर्सची फसवणूक केली जात आहे. हा नवीन व्हॉट्सअ‍ॅप स्कॅम यूके सरकारच्या एका मेसेजशी संबंधित आहे. या मेसेजचा वापर करून लोकांची फसवणूक केली जात आहे.
  या मेसेजद्वारे होतेय लोकांची फसवणूक -
  एका रिपोर्टमध्ये असं सांगण्यात आलंय की व्हॉट्सअ‍ॅप युजर्सना त्यांच्या फोनमध्ये एक मेसेज येत आहे, ज्यामध्ये फ्री व्हिसा आणि जॉब बेनिफिट्सची माहिती देण्यात आली आहे. जे लोक कामासाठी यूकेला जायला इच्छुक आहेत, त्यांनाच हे मेसेज येत आहेत. या स्कॅममध्ये व्हॉट्सअ‍ॅप युजर्सना एक मेसेज पाठवला जातोय, त्यामध्ये यूकेमधील नोकरभरती अभियानाची माहिती देण्यात येत आहेत. यूकेला 2022 मध्ये 1,32,000 पेक्षा जास्त अतिरिक्त कामगारांची गरज आहे आणि म्हणून सरकार भरती मोहीम राबवत आहे. या मोहिमेत 1,86,000 पेक्षा जास्त जागा रिक्त आहेत, असं त्या मेसेजमध्ये म्हटलंय. नवभारत टाईम्सने या संदर्भात वृत्त दिलंय.
  तसंच या मेसेजमध्ये दिलेल्या लिंकवर कोणत्याही युजरने क्लिक केल्यास त्यांना फेक डोमेनवर रीडायरेक्ट केलं जातं. ही वेबसाइट यूके व्हिसा आणि इमिग्रेशन वेबसाईट (Immigration Website) असल्याचं दाखवत यूकेमध्ये उपलब्ध नोकऱ्यांसाठी अर्ज करण्यासदेखील सांगते. रिपोर्टनुसार, "प्रोग्राम कव्हर, ट्रॅव्हल एक्सपान्सेस, घर, राहण्याची सोय आणि वैद्यकीय सुविधा दिल्या जातील. तसंच अर्जदाराचं वय 16 वर्षे किंवा त्यापेक्षा जास्त असणं आवश्यक आहे. बेसिक इंग्रजीचं ज्ञान आवश्यक आहे. या मेसेजमध्ये या प्रोग्रामचे फायदेही सांगितले आहेत. त्यानुसार, इन्स्टंट वर्क परमिट, व्हिसा अ‍ॅप्लिकेशन असिस्टंट मदत करतील. आणि कोणत्याही देशाचे नागरिक यासाठी अर्ज करू शकतात, असंही मेसेजमध्ये म्हटलंय. हा प्रोग्राम ज्यांना काम आणि अभ्यास करण्याची इच्छा आहे, त्या सर्व व्यक्ती आणि विद्यार्थ्यांसाठी खुला आहे. इच्छुकांनी इथे अर्ज करावा," असं त्या मेसेजमध्ये लिहिलंय.
  या व्हॉट्सअ‍ॅप स्कॅमपासून दूर कसे रहाल?
  यापूर्वीही व्हॉट्सअ‍ॅप घोटाळ्याची अशी अनेक प्रकरणं समोर आली आहेत. अशा घोटाळ्यांमध्ये अनेक युजर्सना लाखो रुपयांचा गंडा घातला गेलाय. व्हॉट्सअ‍ॅपवरील मेसेज एंड-टू-एंड एन्क्रिप्टेड असल्यामुळे हॅकर्सना शोधणं कठीण असतं. त्यामुळे अशा प्रकारचे स्कॅम टाळण्याचा सर्वांत सोपा आणि उत्तम मार्ग म्हणजे अशा मेसेजवर विश्वास न ठेवणं. अशा अनोळखी नंबरवरून आलेल्या मेसेजवर किंवा लिंकवर चुकूनही क्लिक करू नका, नाहीतर तुमचीही फसवणूक होऊ शकते.
  First published:

  Tags: Online fraud, Whatsapp

  पुढील बातम्या