आपल्याच मालाच्या पैशांऐवजी शिवीगाळ, शेतकऱ्यांनी व्यापाऱ्यावर केला गुन्हा दाखल

आपल्याच मालाच्या पैशांऐवजी शिवीगाळ, शेतकऱ्यांनी व्यापाऱ्यावर केला गुन्हा दाखल

शेतकऱ्यांचा घाऊक कांदा खरेदी करून पैसे देण्यास व्यापाऱ्यांनी 21 महिन्यांपासून टाळाटाळ केली.

  • Share this:

पुणे, 23 डिसेंबर : एकीकडे केंद्र सरकारच्या कृषी विधेयक व त्या संबंधी कायदा लागू करू नये यासाठी दिल्लीत शेतकऱ्यांचं आंदोलन सुरू असताना दुसरीकडे मात्र पुणे (Pune) जिल्ह्यातील आंबेगाव तालुक्यात मात्र एका व्यापाऱ्यावर शेतकऱ्यांना फसवल्याचा गुन्हा दाखल झाला आहे.

आंबेगाव तालुक्यातील घोडेगाव परिसरातील अकरा कांदा उत्पादक शेतक-यांचा 5 लाख 83 हजार 129 रूपयांचा कांदा खरेदी करून त्यांचा कष्टाचा पैसा न देता फसवणूक करणारे लांडेवाडी  येथील कांदा व्यापारी गणेश शेवाळे व शुभांगी शेवाळे यांच्या विरूद्ध घोडेगाव पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली असल्याची माहिती सहायक पोलीस निरीक्षक प्रदिप पवार दिली.

47 वर्षीय मलायकच्या BOLD अंदाजामुळे नेटिझन्स फिदा,इन्स्टाग्रामवर कमेंट्सचा पाऊस

घोडेगाव  परीसरातील अकरा कांदा उत्पादक शेतक-यांकडून 24 मार्च 2019 रोजी मंचर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या पाठीमागे गणेश भगवान शेवाळे व त्याची पत्नी शुभांगी शेवाळे यांचे कार्यालय आहे. त्यांनी 1 हजार 523 कांदयाच्या पिशव्या 7 लाख 1 हजार 679 रूपयाला खरेदी केल्या. त्यातील 1 लाख 18 हजार 550 रूपये काही शेतक-यांना दिले. तर काही जणांना धनादेश दिले. मात्र ते रद्द होवून परत आले. त्यामुळे शेतक-यांना उरलेले 5 लाख 83 हजार 129 रूपये मिळाले नाही.

शेतकऱ्यांचा घाऊक कांदा खरेदी करून पैसे देण्यास व्यापाऱ्यांनी 21 महिन्यांपासून टाळाटाळ केली. शेतकऱ्यांनी तगादा लावल्यानंतर व्यापाऱ्यांनी शिवीगाळ करून 'तुम्ही परत येथे पैशाची मागणी करण्यासाठी आला तर तुमच्यावर गुन्हा दाखल' करण्याची धमकी दिली.

त्यामुळे संबंधित शेतकऱ्यांची फसवणूक झाल्याची खात्री झाल्याने शेतकरी गोविंद भास्कर, संदिप काळे, दशरथ काळे, सुभाष काळे, वसंत काळे, रमेश काळे, विजय शिंदे, मयुर झोडगे, प्रकाश असवले, रोहिदास गाडे यांच्यातर्फे संतोष दरेकर यांनी घोडेगाव पोलीस ठाण्यात तक्रार दिली.

एअर इंडियाच्या प्रवाशांना फ्रीमध्ये करता येईल तिकिट रिशेड्यूल,या कालावधीसाठी ऑफर

कांदा, द्राक्षे, डाळिंब, केळी उत्पादक शेतक-यांचे मागील काही वर्षांपासून मालविक्रीचे पैसे व्यापाऱ्यांकडे अडकुन पडले त्या संबंधित शेतकऱ्यांनी घोडेगाव पोलीस ठाण्यात संपर्क साधावा, असं आवाहन सहायक पोलीस निरीक्षक प्रदिप पवार यांनी केले आहे.

Published by: sachin Salve
First published: December 23, 2020, 7:54 AM IST

ताज्या बातम्या