मराठी बातम्या /बातम्या /क्राईम /VIDEO च्या बहाण्याने 4 मित्रांनी केला घात; तरुणाचा मृतदेह रुग्णालयाबाहेर ठेवून काढला पळ

VIDEO च्या बहाण्याने 4 मित्रांनी केला घात; तरुणाचा मृतदेह रुग्णालयाबाहेर ठेवून काढला पळ

मित्रांनीच मित्राचा घात घेल्याचा धक्कादाय प्रकार समोर आला आहे.

मित्रांनीच मित्राचा घात घेल्याचा धक्कादाय प्रकार समोर आला आहे.

मित्रांनीच मित्राचा घात घेल्याचा धक्कादाय प्रकार समोर आला आहे.

अमृतसर, 16 ऑगस्ट : काठुनंगलमध्ये 4 मित्रांनी जुन्या वादातून करणदीप सिंग (16) याची गोळ्या झाडून हत्या (Friends Killed) केली. इंटरनेटवर व्हिडिओ बनवण्याच्या बहाण्याने त्यांनी तिला घरातून नेलं. गुन्हा केल्यानंतर आरोपींनी किशोरला खाजगी रुग्णालयाबाहेर जखमी अवस्थेत सोडले. आणि तिथून पळून गेले. दुसरीकडे, घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी पोहोचले. मृतदेह ताब्यात घेतल्यानंतर शवविच्छेदन करण्यात आले आहे. (Crime news)

रविंदर सिंग यांनी सांगितलं की, त्यांंचा मुलगा करणदीप सिंग याची हत्या काठुनंगलमधील निवासी शेरू (16), विशाल (19), सन्नी (17) आणि मंगल सिंग (22) यांनी केली असून त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. एएसआइ हरजीत सिंग यांनी सांगितलं की, आरोपींना अटक करण्यासाठी छापेमारी सुरू आहे.

रवींदर सिंग यांनी पुढे सांगितलं की, ते कष्ट करून कुटुंब चालवतात. त्यांची दोन मुलं करणदीप सिंग (16) आणि कुलदीप सिंग (14) शिक्षण करीत आहेत. या परिसरात राहणारे मंगल सिंह याच्यासोबत त्यांचा मोठा मुलगा करणदीप सिंग याची मैत्री आहे. मात्र त्याच्या मनात करणविषयी कटुता होती. अनेकदा आरोपी त्याच्या मुलाशी छोट्या छोट्या गोष्टीवरून भांडत असत. सोमवारी, चारही आरोपी त्याच्या घरी पोहोचले आणि इंटरनेटवर व्हिडिओ बनवण्याच्या बहाण्याने त्यांना त्यांच्यासोबत घेऊन गेले. जागरणने यासंदर्भातील वृत्त प्रसिद्ध केलं आहे.

हे ही वाचा-पुलावर रक्ताच्या थारोळ्यात तडफडत राहिला; चायनीज मांज्यामुळे बुलेटस्वाराचा मृत्यू

रवींदर सिंग यांनी सांगितले की काही वेळाने आरोपी त्याला धीर सिंह नावाच्या व्यक्तीच्या गच्चीवर घेऊन गेले. शेरू आपला काका गुरमेल सिंह (माजी सैनिक) ची रायफल घेऊन तिथे पोहोचला. आरोपीने त्याच रायफलने करणची गोळ्या झाडून हत्या केली. या घटनेनंतर चार आरोपींनी करणदीपला फतेहगड चुडिया रोडवरील एका रुग्णालयाबाहेर सोडून पळ काढला. तेथून हॉस्पिटल व्यवस्थापनाने पोलिसांना घटनेची माहिती दिली पण तोपर्यंत करणदीप सिंगचा मृत्यू झाला होता.

First published:
top videos

    Tags: Crime news, Gang murder, Murder, Punjab