हैदराबाद 26 मार्च : तेलंगणाची राजधानी हैदराबाद शहरातील कुशाईगुडा भागात एकाच कुटुंबातील चार जणांनी विष प्राशन करून आत्महत्या केल्याची हृदयद्रावक घटना समोर आली आहे. शनिवारी पोलिसांनी याबाबत माहिती दिली. सतीश, त्यांची पत्नी वेधा आणि त्यांची दोन मुले निशिकेथ आणि निहाल अशी मृतांची नावे आहेत. ही घटना शुक्रवारी रात्री घडली असावी, असा संशय पोलीस अधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे. मात्र शनिवारी दुपारी पोलिसांना याची माहिती मिळाली. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळ गाठून गुन्हा दाखल केला.
पोलिसांनी सांगितलं की, कुशाईगुडा परिसरात वडील, आई आणि त्यांच्या दोन मुलांनी विष प्राशन करून आत्महत्या केली. प्राथमिक चौकशीत दोन्ही मुलांना आरोग्यासंबंधी समस्या असल्याचं समोर आलं आहे. उपचार करूनही मुलं बरी होत नसल्याने पालक नैराश्यात गेले आणि संपूर्ण कुटुंबाने आत्महत्या केली. कुशाईगुडा पोलीस ठाण्याचे प्रमुख पी व्यंकटेश्वरलू यांनी सांगितलं की, कुटुंबाने शुक्रवारी रात्री आत्महत्या केल्याचा संशय आहे. मात्र शनिवारी दुपारी या घटनेची माहिती पोलिसांना मिळाली होती. मृतदेह मोर्चरीमध्ये ठेवण्यात आले आहेत. मात्र अद्याप पोस्टमार्टम बाकी आहे.
मुलांच्या वादात घरातल्या लोकांची उडी, दिराचं वहिनीसोबत भयानक कांड
याशिवाय माहिती देताना ते म्हणाले की, याप्रकरणी मृतांच्या नातेवाईकांच्या वतीने कोणताही गुन्हा दाखल करण्यात आलेला नाही. सध्या तपास सुरू आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, पोलिसांनी सांगितलं की, खोलीत पोटॅशियम सायनाइडची बाटलीही सापडली आहे. आधी मुलांना सायनाईड देऊन मारलं आणि नंतर पती-पत्नीनं सायनाइड पिऊन आत्महत्या केली असावी, असा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे.
काही दिवसांपूर्वी हैदराबादच्या वानापर्थीमध्येही असंच एक प्रकरण समोर आलं होतं, जिथे एकाच घरातील चार सदस्य संशयास्पद स्थितीत मृतावस्थेत आढळले होते. मृतांमध्ये एका 10 वर्षांच्या मुलाचाही समावेश होता. हे संपूर्ण प्रकरण एका तांत्रिकाशी संबंधित असल्याचं स्थानिक लोकांनी सांगितलं होतं.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Local18, Shocking news