मराठी बातम्या /बातम्या /क्राईम /

हलणारी रुग्णवाहिका पाहून लोकांना आली शंका; पोलिसांनी तपासणी केल्यानंतर दिसलं भलतंच

हलणारी रुग्णवाहिका पाहून लोकांना आली शंका; पोलिसांनी तपासणी केल्यानंतर दिसलं भलतंच

वाराणसीच्या रामनगर पोलीस ठाणे हद्दीतील सुजाबाद चौकी परिसरात हा लज्जास्पद प्रकार सुरू होता. येथे एका रुग्णवाहिकेमध्ये (Ambulance) एक तरुणी आणि तीन तरूण अश्लील चाळे करत होते.

  • Published by:  News18 Desk

वाराणसी, (उत्तर प्रदेश) : कोरोनामुळे सध्या सर्वत्र रुग्णवाहिका (Ambulance) मिळणं कठीण झालं आहे. कित्येक फोन करूनही वेळेवर रुग्णवाहिका उपलब्ध होईल की नाही हे सांगता येत नाही. एकीकडे रुग्णांना योग्यवेळी रुग्णवाहिका मिळत नसताना त्यामध्ये अश्लील प्रकार सुरू असल्याची धक्कादायक घटना वाराणसीमध्ये समोर आली आहे.

वाराणसीच्या रामनगर पोलीस ठाणे हद्दीतील सुजाबाद चौकी परिसरात हा लज्जास्पद प्रकार सुरू होता. येथे एका रुग्णवाहिकेमध्ये एक तरुणी आणि तीन तरूण अश्लील चाळे करत होते. भागातील नागरिकांनी केलेल्या तक्रारीनंतर पोलिसांनी जाऊन येथून या चौघांनाही अटक केली असून रुग्णवाहिका ताब्यात घेण्यात आली आहे.

सुजाबाद परिसरात एका निर्मनुष्य ठिकाणी रुग्णवाहिका हालत असल्याचे काहींना दिसून आले. भरपूर वेळापासून ती रुग्णवाहिका तिथेच थांबून होती आणि सतत हलत असल्यानं लोकांना शंका आली. त्यामुळं काहींनी पोलिसांना या गोष्टीची माहिती दिली आणि पोलिसांनीही घटनास्थळी येऊन पाहणी केल्यानंतर हा धक्कादायक प्रकार समोर आला.

हे वाचा - विरारमध्ये लग्न समारंभादरम्यान फ्रिस्टाईल हाणामारी; पाहुण्यांनी एकमेकांना धू धू धुतलं, VIDEO VIRAL

पोलिसांनी आल्यानंतर बंद रुग्णवाहिकेतून तीन तरुण आणि एका तरुणीला बाहेर काढले. या चौघांसह रुग्णवाहिकाही ताब्यात घेऊन रामनगर पोलीस ठाण्यात नेण्यात आली. तीन तरुण आणि या तरुणीविरोधात सार्वजनिक ठिकाणी अश्लील कृत्य केल्याबद्दल गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या चौघांनाही सध्या जेलची हवा खावी लागत आहे.

हे वाचा - प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी गोळ्या घेत असाल तर थांबा! Vitamin-C जास्त प्रमाणात घेतल्यास होतील दुष्परिणाम

सार्वजनिक ठिकाणी अश्लील कृत्य केल्याबद्दल या चौघांनाही अटक करण्यात आली आहे आणि संबंधित रुग्णवाहिका जप्त करण्यात आली आहे, असे एसीपी प्रवीण सिंह यांनी सांगितले. गंगा सेवा धाम नावाच्या एका रुग्णालयाची ही रुग्णवाहिका आहे. ती सध्या एका तरुणाला भाड्यानं चालवण्यासाठी दिली आहे, असेही पोलिसांच्याकडून सांगण्यात आले आहे. सध्या रुग्णवाहिका सर्वत्र धावतानाच दिसून येत असताना ही एक रुग्णवाहिका बराच वेळ एकाच ठिकाणी आणि तेही निर्मनुष्य ठिकाणी उभी होती आणि ती हलत असल्यानं परिसरातील लोकांना शंका आली आणि नंतर त्यांनी पोलिसांना कळवल्यानंतर कारवाई करण्यात आल्याचं पोलिसांनी सांगितले.

First published:

Tags: Corona updates, Uttar pardesh, Uttar pradesh news